esakal | हिंगोली जिल्ह्यासाठी हेमंत पाटील यांच्या प्रयत्नाने ११ हजार २०० कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध

बोलून बातमी शोधा

खासदार हेमंत पाटील
हिंगोली जिल्ह्यासाठी हेमंत पाटील यांच्या प्रयत्नाने ११ हजार २०० कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध
sakal_logo
By
राजेश दार्वेकर

हिंगोली : कोरोना प्रतिबंधक लस अत्यंत सुरक्षित असून ता. एक मेपासून सुरु होणाऱ्या सर्वसमावेश लसीकरणाचा लाभ हिंगोली जिल्ह्यातील नागरिकांनी घ्यावा असे आवाहन खासदार हेमंत पाटील यांनी केले आहे. तसेच हिंगोली जिल्ह्याची लसीकरणाची गरज लक्षात घेता ११ हजार २०० प्रतिबंधक लस खासदार पाटील यांच्या प्रयत्नाने उपलब्ध झाल्या आहेत.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला सुरुवात करण्यात आली आहे. जिल्ह्यामध्ये लसींचा तुटवडा असल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर आल्यामुळे खासदार हेमंत पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत याबाबतचा आढावा घेतला. हिंगोली जिल्ह्यासाठी लस उपलब्ध करून देण्यासाठी खासदार पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधून मुबलक प्रमाणात साठा उपलब्ध करून देण्याची विनंती करण्यात केली होती. त्यानुसार विभागीय उपायुक्ताना निर्देश देण्यात आले आणि तात्काळ १० हजार कोविशील्ड आणि एक हजार २०० कोवॅक्सीन असे एकूण ११ हजार २०० लस उपलब्ध करून देण्यात आल्या. कोरोना प्रतिबंधक लसी बाबत देशातील जनतेमध्ये भीती आणि शंका आहेत याबाबत जनजगृती करून मोठ्या प्रमाणात नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लस घेण्याचे आवाहन खासदार हेमंत पाटील यांनी केले.

हेही वाचा - शिक्षकाने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत 28 जणांची नावे असून देवाण- घेवाणीचा आकडा मोठा असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान पोलिसांनी 28 पैकी दोन जणांना ताब्यात घेतले असल्याचे पोलिस निरीक्षक अभिमन्यु साळुंके यांनी सांगितले.

हिंगोली जिल्ह्यासाठी आजवर ६० हजार लस उपलब्ध झाल्या असून त्यापैकी ५४ हजार नागरिकांचे लसीकरण झाले आहे. यामध्ये प्रामुख्याने आरोग्य कर्मचारी, पोलिस कर्मचारी यांचा समावेश होता. ता. एक मेपासून देशात १८ वर्षावरील सर्वाना लसीकरण करण्यात येणार आहे. आगामी काळात मोठ्या प्रमाणात लसींचा साठा उपलब्ध होणार आहे. लसीकरणाची व्याप्ती वाढविण्यासाठी जिल्ह्यात ६२ ठिकाणी लसीकरण केंद्र चालू करण्यात येणार असून, गरजेनुसार केंद्र वाढविण्यात येतील असे खासदार हेमंत पाटील म्हणाले. त्यामुळे जिल्ह्यात लसीकरण पुन्हा जोरात चालू होणार आहे. तरी नागरिकांनी लसीकरण करुन घ्यावे व प्रशासनाला सहकार्य करावे असे असेही खासदार पाटील म्हणाले.

संपादन- प्रल्हाद कांबळे