esakal | नांदेड : शिक्षकाच्या आत्महत्येप्रकरणी 28 जणांविरुद्ध गुन्हा; दोघांना घेतले ताब्यात

बोलून बातमी शोधा

sucied
नांदेड : शिक्षकाच्या आत्महत्येप्रकरणी 28 जणांविरुद्ध गुन्हा; दोघांना घेतले ताब्यात
sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : व्याजाने घेतलेल्या पैशाची परतफेड करण्यासाठी लोकांनी लावलेल्या तगाद्यामुळे शहराच्या श्रीकृष्णनगर भागातील एका शिक्षकाने विष प्राशन करुन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी (ता. २८) सकाळी घडली होती. शिक्षकाने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत 28 जणांची नावे असून देवाण- घेवाणीचा आकडा मोठा असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान पोलिसांनी 28 पैकी दोन जणांना ताब्यात घेतले असल्याचे पोलिस निरीक्षक अभिमन्यु साळुंके यांनी सांगितले. हा गुन्हा ता. २८ एप्रील रोजी वेलिंग्टन शाळेच्या बाजूला रात्री सहाच्या सुमारास घडला होता.

कॅनाल रस्त्यावर असलेल्या श्रीकृष्णनगर भागात राहणार्‍या प्रशांत पंढरीनाथ इंदुरकर (वय ४६) रा. रहाटी ता. कंधार हल्ली मुक्काम श्री. कृष्णानगर नांदेड यांनी विष प्राशन करुन केलेल्या आत्महत्येमुळे एकच खळबळ उडाली आहे. व्याजाने घेतलेले पैसे परत मागण्यासाठी देणेकरी रात्री- अपरात्री येऊन धमक्या देऊन त्रास देत असल्याने प्रशांत इंदुरकर यांनी या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची तक्रार नम्रता प्रशांत इंदूरकर ( खासगी शाळेतील शिक्षिका) यांनी पोलिसात दिली. त्यानुसार 28 जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असला तरी आत्महत्येपूर्वी लिहिलेली सुसाईड नोट पोलिसांनी जप्त केली आहे. सुमारे तीन पानांचे असलेल्या सुसाईड नोटमध्ये आत्महत्येस कोण जबाबदार आहेत आणि कशामुळे आत्महत्येसारखे पाऊल उचलले आहे याचा उल्लेख केल्याचे सांगितले जाते. सापडलेल्या सुसाईड नोटच्या आधारे पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली असून त्यातील 28 जणांपैकी दोघांना ताब्यात घेतल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक अभिमन्यु साळुंके करत आहेत.

हेही वाचा - कळमनुरी तालुक्यातील येलकी येथील सशस्त्र सीमा बल या बटालियनमध्ये प्रशिक्षणासाठी आलेल्या ३१२ जवानापैकी एकशे दहा प्रशिक्षणार्थी जवानाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे.

सुसाईट नोटमध्ये यांची आहेत आरोपीमध्ये नावे

होनराव केरबा, होनराव केरबा याची पत्नी, मुलगा, तिघेही राहाणार मराठा बारच्या मागे विनायकनगर, संजय पवार व त्याची पत्नी रा. नवा मोंढा, बालाजी पवार आणि त्याची पत्नी, मुलगा नागेश, गोविंद, रा. विद्यूत कार्यालयाजवळ भीमगड कंधार, संतोष देशमुख रा. औरंगाबाद, शिक्षक श्रीकांत हळदेकर व त्याची पत्नी रा. सिडको, दादाराव गणपतराव बुक्तरे वनराज बुक्तरे, पुरुषोत्तम बुक्तरे तिघेही राहणार खडकूत ता. अर्धापूर, आनंद सावंत व त्याचा मुलगा, मुलगी रा. राजकाॅर्नर, रामेश्वक पोपुलवाड रा. श्रीनगर हनुमान टेकडी, शिक्षक दादाराव नवघरे व त्याची पत्नी रा. शिवाजी शाळेच्या पाठीमागे कंधार, मनिष वडजे व त्याचा मुलगा रा. चौथा मजला बिके हाॅल, श्रीनगर, माधव पवळे रा. झंकार बारच्या पाठीमागे रामराव पवार मार्ग, शेख मुख्तार, शेख सुमेर, शेख समदानी छोटी दर्गाहजवळ कंधार आणि इतर तीन जण.