लातूर-औसा महामार्गावर अपघात, बारा जण जखमी

जलील पठाण
मंगळवार, 5 नोव्हेंबर 2019

औसा (जि. लातूर) - येथून लातूरकडे जाणाऱया मार्गावरील अलमला पाटीजवळ भरधाव व काळी पिवळी आणि कारचा भीषण अपघात झाला. यात बारा जण जखमी झाले आहेत. काही जखमींवर लातूर तर काहींवर सोलापूर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना सोमवारी (ता. चार) रात्री दहाच्या सुमारास घडली.

लातूर-औसा दरम्यान अलमला पाटीजवळ काळी पिवळी जीप आणि एका कारचा भीषण अपघात होऊन यामध्ये बारा प्रवासी जखमी झाल्याची घटना सोमवारी रात्री दहाच्या सुमारास घडली आहे. वाहनांची टक्कर एवढी भीषण होती की यामध्ये प्रवासी वाहतूक करणाऱ्या जीपचा सांगाडा मूळ चेसीवरून वेगळा झाला. जखमींना लातूर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 

लातूरहून औशाकडे येणारी काळी पिवळी प्रवासी वाहतूक करणारी जीप क्रमांक एम. एच. 24 एफ. 544 व औशाहून लातूरकडे जाणारी कार क्रमांक एम. एच. 24-ए एस -5482 या वाहनांची अलमला पाटीजवळ समोरासमोर जोराची धडक झाली.

यामध्ये काळीपिवळीमधील औसा येथील समिरउल्ला काझी (36), रफत बेगम काझी (65), नसरीन बेगम काझी (55), रुकसाना बेगम काझी (54), नामदेव साठे (35) हे जखमी झाले आहेत. कारमधील सोनेराव शिंदे यांनाही मार लागला असल्याचे घटनास्थळी उपस्थित असणाऱ्या प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. अन्य जखमींची नावे कळू शकली नाहीत. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 12 Injured in Accident at Latur