मराठवाड्यात 12 लाख नागरिकांची टॅंकरवर मदार 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 22 डिसेंबर 2018

608 गावे, 84 वाड्यांवर तीव्र पाणीटंचाई 

औरंगाबाद, ता. 21 : मागील काही वर्षांपासून दुष्काळाशी दोन हात करणाऱ्या ग्रामस्थांना दरवर्षी सरकारी घोषणांचा नुसताच सुकाळ पाहून क्षणिक आनंद मानावा लागत आहे. योजना पूर्णपणे राबविल्याचे कागदी घोडे नाचविणाऱ्या प्रशासनाला अद्यापही टॅंकरपासून नागरिकांची सुटका करता आलेली नाही. विशेष म्हणजे, मागील तीन दिवसांपूर्वी 568 गावे, 73 वाड्यांवर 705 टॅंकरने पाणीपुरवठा सुरू होता. सध्या 608 गावे, 84 वाड्यांवर 763 टॅंकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा सुरू असून 12 लाख 76 हजार 581 जणांना या टॅंकरवर अवंलबून राहावे लागत आहे. 

गावागावांत पाणीपुरवठ्यासह अन्य योजनांवर कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले आहेत. असे असतानाही टॅंकरने पाणीपुरवठा होत असलेल्या गावांची संख्या घटण्याऐवजी वाढतच असल्याचे शासनाकडूनच उपलब्ध आकडेवारीनुसारच स्पष्ट झाले आहे. मागील तीन दिवसांत मराठवाड्यात टॅंकरची 58 ने भर पडली आहे. पाणीपुरवठ्यासाठी टॅंकरव्यतिरिक्‍त 598 खासगी विहिरी अधिग्रहण करण्यात आल्या होत्या; मात्र उष्णतेची तीव्रता वाढल्याने यात भर पडली आहे. 608 गावे, 84 वाड्यांवर 47 शासकीय व 716 खासगी अशा 763 टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. केवळ तीन दिवसांत 96 खासगी विहिरी अधिग्रहण कराव्या लागल्या असून, टॅंकरच्या संख्येतही मोठी वाढ होत आहे. येत्या काही दिवसांत टॅंकरची संख्या तर वाढणारच आहे. शिवाय, चाऱ्याची टंचाईही गंभीर बनत आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासोबतच जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्‍न सोडविण्यासाठी प्रशासनाला पुढे यावे लागले. विशेष म्हणजे मराठवाड्यात सर्वाधिक पाणीटंचाई ही औरंगाबाद जिल्ह्यातच आहे. 

आकडे बोलतात... 
- औरंगाबाद जिल्ह्यातील 380 गावे, 30 वाड्यांसाठी 492 टॅंकर 
- जालना जिल्ह्यातील 68 गावे, 2 वाड्यांसाठी 101 टॅंकर 
- बीड जिल्ह्यात 153 गावे आणि 51 वाड्यांसाठी 162 टॅंकर 
- उस्मानाबाद जिल्ह्यातील 6 गावांत 6 टॅंकर 

Web Title: 12 lack people depend on tanker