Covid-19 : बीडला आणखी धक्का; १३ नवे रुग्ण आढळले

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 21 May 2020

जिल्ह्याची कोरोनाची रुग्णसंख्या ३६ वर पोचली आहे. यात एका महिलेचा मृत्यू तर सहा रुग्णांवर पुण्यात उपचार सुरू आहेत.

बीड : मागचे दोन महिने शुन्यावर असलेल्या बीड जिल्ह्यात शनिवारपासून (ता. १६) सुरू झालेले कोरोना मीटर थांबायला तयार नाही. बुधवारी (ता. २०) पाठविलेल्या १३ स्वॅबचे अहवाल पॉझिटव्ह असल्याचा अहवाल गुरुवारी (ता. २१) प्राप्त झाला. यामुळे आता जिल्ह्याची कोरोनाची रुग्णसंख्या ३६ वर पोचली आहे. यात एका महिलेचा मृत्यू तर सहा रुग्णांवर पुण्यात उपचार सुरू आहेत.

आतापर्यंत पहिल्या तीन टप्प्यात आढळलेले २३ कोरोनाग्रस्त हे मुंबईहून परतलेले आहेत. यातील काही जण हे विनापरवाना आलेले आहेत. दरम्यान, आष्टी तालुक्यातील सांगवी पाटण येथे नातेवाइकांकडे मुंबईहून आलेल्या नगर जिल्ह्यातील एकाच कुटुंबातील सात जणांना कोरोना विषाणूची बाधा झाल्याचे रविवारी समोर आले होते.

धक्कादायक : औरंगाबादेत एकाच वाड्यात तब्बल ६७ कोरोनाबाधित

सोमवारी पहाटे यातील वृद्धेचा मृत्यू झाला. त्यानंतर उर्वरित सहा जण पुढील उपचारासाठी पुण्याला गेले. दरम्यान, बुधवारी पाठविलेल्या ११४ स्वॅब नमुन्यांपैकी ९० नमुने निगेटीव्ह तर चार जणांचे नमुने पॉझिटीव्ह आढळले होते. तर, सहा जणांचा निष्कर्ष निघालेला नसून १३ नमुने प्रलंबित हेाते. याचा अहवाल गुरुवारी दुपार नंतर प्राप्त झाला. १३ नमुनेही पॉझिटीव्ह आढळले आहेत. यामध्ये नित्रुड (ता. माजलगाव) या एकाच गावातील ११ जणांचा समावेश आहे. सुर्डी (ता. माजलगाव) व कुंडी (ता. धारुर) येथील एकाचा समावेश आहे.

 असे ओळखा नैसर्गिकरीत्या आणि कृत्रिमरीत्या पिकलेले आंबे
 
आठ तालुक्यांत कोरोनाचा शिरकाव 
दरम्यान, आतापर्यंत बीड शहरासह माजलगाव, धारूर, पाटोदा, वडवणी, केज, आष्टी व गेवराई या तालुक्यांत कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. यापूर्वी आष्टी येथे नातेवाईकांकडे आलेल्या एकाच कुटुंबातील सात जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. आता, नित्रुड (ता. माजलगाव) या गावातील ११ रुग्णांचा समावेश आहे. केवळ अंबाजोगाई, परळी व शिरुर
कासार हे तीनच तालुके कोरोनामुक्त आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 13 new Covid-19 cases In Beed

Tags
टॉपिकस
Topic Tags: