पुण्याच्या मुलाचा जालना जिल्ह्यात बुडून मृत्यू

प्रकाश ढमाले
शनिवार, 20 जुलै 2019

भोकरदन तालुक्यातील अनवा येथील उर्दू शाळेच्या विद्यार्थ्याचा तलावात बुडून मृत्यू झाला.

 

पिंपळगाव रेणुकाई, (जि. जालना) - भोकरदन तालुक्यातील अनवा येथील उर्दू शाळेच्या विद्यार्थ्याचा तलावात बुडून मृत्यू झाला. ही घटना काल (ता. 19) सायंकाळी घडली. आज (ता. 20) तलावातून त्याचा मृतदेह काढण्यात आला. अयान खान इमतियाज खान (वय 14) असे मृताचे नाव आहे. तो पुण्याचा रहिवाशी असून, शिक्षणासाठी अनवा येथे आला होता. 

काल शाळेला सुटी असल्याने अनवा येथील उर्दू शाळेचे काही विद्यार्थी अंघोळीसाठी अनवा पाडा गावाजवळ असलेल्या तलावात गेले होते, मात्र या विद्यार्थ्यांपैकी अयान खान हा परतलाच नाही. त्यामुळे  त्याचा शोध घेण्यात आला. पण, शोध लगला नाही. दुसऱ्या दिवशी आज तलावाबाहेर त्याचे कपडे आढळून आले. 

त्यानंतर ग्रामस्थांनी सकाळी सातपासून तलावात शोधकार्य सुरू केले. अखेर सहा तासानंतर अयानचा मृतदेह तलावात आढळून आला. पारध पोलिसांनी मृतदेह येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी दखाल केला आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 14-year-old boy dead at Jalna dist