"कीर्ती ऑईल'च्या पाच जणांना 15 दिवसांची न्यायालयीन कोठडी 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 फेब्रुवारी 2017

लातूर - येथील अतिरिक्त औद्योगिक वसाहतीतील कीर्ती ऑईल मिलमध्ये टॅंकमधील रासायनिक गाळ काढण्यासाठी उतरलेल्या नऊ कामगारांच्या मृत्यूप्रकरणी अटक करण्यात आलेल्या मिलच्या मालकासह पाच जणांना पंधरा दिवसांची न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सुधाकर बावकर यांनी ही माहिती दिली. 

अतिरिक्त औद्योगिक वसाहतीत हरंगूळ परिसरात असलेल्या कीर्ती ऑईल मिलच्या हौदातील रासायनिक गाळ काढण्याचे काम सोमवारी (ता.30) सुरू होते. त्या वेळी विषारी वायूमुळे गुदमरून नऊ कामगारांचा जागीच मृत्यू झाला होता. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी मिलचे मालक कीर्ती भुतडा, संचालक शिवराम गायकवाड, अंगद गायकवाड, व्यवस्थापक एकनाथ केसरे, तांत्रिक विभागाचा प्रमुख मनोज क्षीरसागर यांना अटक केली होती. त्यांना न्यायालयासमोर उभे केले असता दोन फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. त्यांना गुरुवारी (ता.2) न्यायालयासमोर उभे करण्यात आले. यात न्यायालयाने पाच जणांना पंधरा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावल्याचे बावकर यांनी सांगितले. 

अधिकाऱ्यांची भेट 
दरम्यान या प्रकरणात कामगार, तसेच प्रदूषण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट दिली. प्राथमिक पंचनामेही केले आहेत; पण त्यांच्या हाती फारसे काही लागलेले नाही. त्यामुळे कामगार व प्रदूषण मंडळाचे अधिकारी पुन्हा एकदा घटनास्थळी भेट देण्याची शक्‍यता आहे.

Web Title: 15-day judicial custody for five persons