
रुग्ण संख्येचे हे वाढते आकडे रोखण्यासाठी प्रशासन काय पावले उचलणार, याकडे लातूरकरांचे लक्ष लागले आहे.
लातूर : लातूर शहर आणि जिल्ह्यात कोरोनाचा आकडा वाढत असल्यामुळे नागरिकांमधून आणि राजकीय पक्षांकडून लॉकडाऊनची मागणी होत असताना लातुरात पुन्हा एकदा 15 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. तर 2 रुग्णांचा दिवसभरात मृत्यू झाला. रुग्ण संख्येचे हे वाढते आकडे रोखण्यासाठी प्रशासन काय पावले उचलणार, याकडे लातूरकरांचे लक्ष लागले आहे.
विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत गुरुवारी (ता. 2) 136 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते. त्यातील 107 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. 15 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह तर 13 जणांचे अहवाल अंतिम आले नाहीत. उपचारादरम्यान लातूरमधील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत आज सकाळी एका ज्येष्ठ महिलेचा मृत्यू झाला. तर उदगीरमध्ये बुधवारी (ता.1) मृत्यू झालेल्या एका महिलेचा आज रात्री कोरोना पॉझिटिव्ह अहवाल आला. त्यामुळे दिवसभरात कोरोनामुळे 2 मृत्यू झाल्याची नोंद आहे.
चिंताजनक ! कोरोनाग्रस्तांची संख्या ६ लाखांच्या वर
शहरातील पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या 10 व्यक्ती काळे गल्ली, सम्राट चौक, लोखंड गल्ली, एलआयसी कॉलनी, साळे गल्ली या भागातील आहेत. उर्वरित 3 व्यक्ती उदगीर तर 2 अहमदपूर मधील आहेत. विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या रुग्णालयात एकून 65 रुग्ण दाखल असून सद्यस्थितीत कोरोना अतिदक्षता विभागात 27 रुग्ण दाखल आहेत. 7 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत व उर्वरीत 38 रुग्ण कोरोना विलगीकारण कक्षात दाखल असून त्यांची सद्यस्थितीत प्रकृती स्थिर आहे. आज दिवसभरात 7 रुग्णांना त्यांची प्रकृती पूर्णपणे बरी झाल्यामुळे त्यांना घरी सोडण्यात आले. त्यापैकी 02 रुग्ण अतिदक्षता विभागात दाखल होते. एक रुग्ण 13 दिवस व्हेंटिलेटरवर होते. त्या रुग्णास मधुमेह होता व दुसरा रुग्ण 12 दिवस अतिदक्षता विभागात होते, अशी माहिती कोरोना विलगीकरण कक्षाचे प्रमुख डॉ. रामराव मुंढे, विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेचे सहायक प्राध्यापक डॉ. बालाजी पुरी यांनी दिली.
मनात कोरोनाची भिती असेल तर सरकारने तुमच्यासाठी घेतलाय मोठा निर्णय
कोरोना मीटर