बदलीसाठी 15 हजारांची लाच ; तालुका आरोग्य अधिकारी अटकेत

 उमेश वाघमारे
शनिवार, 19 मे 2018

जालना : सोनक पिंपळगाव उपकेंद्र येथून दहीपूरी उपकेंद्र येथे बदली करण्यासाठी 15 हजार रुपयांची लाच घेताना अंबड येथील तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अनिल वाघमारे याला शनिवारी (ता.19) लाच लुचपत प्रतिबंध विभागाने अंबड येथे हॉस्पिटलमधून अटक केली आहे. 

तक्रारदार यांनी अंबड तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अनिल वाघमारे यांच्याकडे उपकेंद्र सोनक पिंपळगाव येथून दहीपूरी येथील उपकेंद्र येथे प्रशासकीय बदलीसाठी अर्ज केला होता. मात्र आरोग्य अधिकारी डॉ. अनिल वाघमारे याने बदली हवी असेल तर 15 हजार रुपये द्यावे लागतील असे सांगितले. तक्रारदार यांनी पैसे देण्यास होकार दिला. मात्र त्यांची लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदार यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. या तक्रारीची खातर जमा केल्यानंतर अंबड येथील श्री हॉस्पिटल येथे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अनिल वाघमारे याला 15 हजार रुपयांची लाच घेताना अटक केली. 

ही कारवाई पोलिस उपअधीक्षक रवींद्र निकाळजे, पोलिस निरीक्षक आजिनाथ काशीद, विनोद चव्हाण, कर्मचारी अशोक टेहरे, प्रदीप दौंडे, संतोष धायडे, संजय उदगीरकर, गंभीर पाटील, महेंद्र सोनवणे, ज्ञानेश्‍वर म्हस्के, श्री. कुदर, प्रवीण खंदारे यांनी केली. 

Web Title: 15 thousand bribe for transfer; taluka health officer