Beed News : माजलगाव तालुक्यात अठरा लाख टन ऊस गाळप

कारखानदार बांधावर; आणखी दहा ते पंधरा दिवस चालणार कारखाने
18 lakh tonnes of sugarcane is crush in majalgaon taluk beed
18 lakh tonnes of sugarcane is crush in majalgaon taluk beed Sakal

माजलगाव : तालुका परिसरात असलेल्या तीन साखर कारखान्यांनी गाळप हंगाम सुरू झाल्यापासून आतापर्यंत अठरा लाख टन उसाचे गाळप केले आहे. हंगाम सुरू होऊन चार महिने उलटले आहेत.

पावसाअभावी झालेल्या पाणी टंचाईमुळे उसाची कमतरता निर्माण झाली असल्याने कारखानदार शेतकऱ्यांच्या बांधावर जात आहेत. तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर परजिल्ह्यातील ऊसतोड मजूर देखील दाखल झाले आहे. त्यामुळे गाळप हंगाम दहा ते पंधरा दिवस चालण्याची शक्यता आहे.

माजलगाव तालुक्यात लोकनेते सुंदरराव सोळंके सहकारी साखर कारखाना, छत्रपती सहकारी साखर कारखाना तर पवारवाडी येथील खासगी तत्त्वावर असलेला जय महेश साखर कारखाना अशा तीन साखर कारखान्यांसह छोटे- मोठे गुऱ्हाळ व गूळ पावडर निर्मिती कारखाने यावर्षी नव्याने कार्यान्वित झालेले आहेत.

गतवर्षी पावसाळ्यात सरासरीपेक्षा निम्याने कमी झालेल्या पावसामुळे पाणीटंचाईचे संकट पावसाळ्यातच जाणवले होते. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना ऊस पीक मोडावे लागले. त्यामुळे दरवर्षी पेक्षा कमी प्रमाणात यावर्षी ऊस गाळपास उपलब्ध होता. तालुका परिसरात उपलब्ध असलेल्या उसाच्या उपलब्धतेवर मराठवाड्यातील अनेक कारखाने ऊस घेवुन जात आहेत.

ऊस गाळपात तालुक्यातील पवारवाडी येथील जय महेश कारखान्याला सुरवातीला ऊस गाळपासाठी तांत्रिक अडचणी आल्या. परंतु, कारखाना प्रशासनाने आलेल्या तांत्रिक अडचणींवर मात केल्याने या कारखान्याचे आज अखेर आठ लाख मेट्रीक टन उसाचे गाळप झाले आहे. ऊस गाळपात जिल्ह्यात सर्वाधिक ऊस गाळप करणारा जय महेश कारखाना ठरला आहे, अशी माहिती या कारखान्याचे मुख्य शेतकी अधिकारी सुजय पवार यांनी दिली.

कारखान्यांनी केलेले गाळप

  • जय महेश साखर कारखाना - आठ लाख

  • सुंदरराव सोळंके सहकारी साखर कारखाना - पाच लाख ९० हजार

  • छत्रपती सहकारी साखर कारखाना - चार लाख ६,५००

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com