भावाचा निर्घृण खून करणाऱ्या दोघांना अटक 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 4 एप्रिल 2019

परभणी : साखरगाठी चे दुकान लावण्याच्या कारणावरून भावाने भावाचा भर बाजारात कत्तीने वार करून निर्घृण खून केल्याची घटना गुरुवारी (ता. 4) सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेतील दोन्ही आरोपींना नानलपेठ पोलीस ठाण्यातील विशेष शाखेच्या पथकाने साडे अकराच्या सुमारास खानापूर परिसरातून पाठलाग करून अटक केली.

शहरातील भोई गल्ली भागात राहणार युवक सोमनाथ आडणे (वय 24) हा सकाळी गुजरी बाजार परिसरात साखर गाठीचे दुकान लावण्यासाठी आला होता. बुधवारी (ता.3) रात्री सोमनाथ आडणे याचा त्याचे सावत्र भाऊ सचिन व नितीन आडणे यांच्याशी वाद झाला होता. गुरुवारी (ता.4) सकाळी गुजरी बाजार परिसरात दुकान लावण्यावरून वाद झाला. या वादाचे पर्यावसान हाणामारीत झाले. गुजरी बाजार परिसरात सकाळी मारेकऱ्यांनी धारदार शास्त्राने सोमनाथ आडणे याच्यावर वार केले आरोपी नितीन व सचिन आडणे हे दोघे गुन्हा करून फरार झाले होते.

नानल पेठ पोलीस ठाण्यातील विशेष शाखेच्या पथकाच्या कर्मचारांनी दोघांचा पाठलाग करून त्यांना वसमत रस्त्यावरील खानापूर फाटा येथून ताब्यात घेतले.

Web Title: 2 arrested for brother s murder