विजेचा शॉक लागून दोन शेतकरी भावांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 2 जुलै 2019

बाऱ्हाळी (जि. नांदेड) : भेंडेगाव (बु.) (ता.मुखेड,जि.नांदेड) येथे शेतात ट्रॅक्टरने नांगरणी करत असताना ट्रॅक्टरचा विजेच्या खांबाला लावलेल्या तनावाशी संपर्क झाल्याने शॉक लागून दोन सख्ख्या शेतकरी भावाचा दुदैवी मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (ता. 2) घडली.

मुखेड तालुक्यात विशेषतः बा-हाळी परीसरात अद्याप मोठा पाऊस झाला नसल्यामुळे पेरणीपूर्व मशागतीची कामे सुरु आहेत. यातच भेंडेगाव (बु.) येथील शेतकरी रमेश सदाशिव पाटील व त्यांचा भाऊ मंगेश सदाशिव पाटील यांनी स्वतःच्या ट्रॅक्टरने नांगरण करत असताना त्याच शेताच्या मधोमध असलेल्या वीजवाहिनी खांबाला लावलेल्या तनाव्याला ट्रॅक्टरचा संपर्क झाला तनाव्यात वीज प्रवाह असल्यामुळे ट्रॅक्टरचालक शेतकऱ्यांला विजेचा जबर शॉक लागला हे पाहून जवळच असलेला दुसरा भाऊ त्याला वाचवण्यासाठी आला असता तोही विजेच्या संपर्कात आला. दोघांनाही जबर विजेचा शॉक लागला. त्यांना तात्काळ मुखेड येथील उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले मात्र तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले .

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 2 farmer brothers dies due to electric shock in Nanded