कर्जामुळे दोन शेतकऱ्यांच्या आत्महत्या 

suicide
suicide

नांदेड : सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून जिल्ह्यात दोन शेतकऱ्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्या. या प्रकरणी माळाकोळी व शिवाजीनगर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

जिल्ह्यातील कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या काही केल्या आत्महत्या काही थांबेनात. निसर्गाच्या या लहरीपणामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. दररोज एक या प्रमाणे जिल्ह्यात कर्जबाजारी शेतकर आपला परिवार उघड्यावर टाकून मृत्यूला कवटाळत आहे. नुकतीच उमरी तालुक्यातील तुराटी येथील कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या सरणाची राख विझली नाही तर पुन्हा दोन शेतकऱ्यांनी गळफास घऊन आपली जीवनयात्रा संपविली. यात लोहा तालुक्यातील गोलेगाव येथील कर्जबाजारी शेतकरी रामराव मारोती चोले (वय 55) यांच्या शेतात मागील काही वर्षापासून सतत नापिकी होत होती. यामुळे प्रपंच चालविण्यासाठी त्यांनी कर्ज काढले होते. परंतु कर्जाचा डोंगर वाढत चालल्याने व सततची नापिकी यामुळे ते त्रस्त होते. मंगळवारी (ता. 13) त्यांनी सायंकाळी आपल्या शेतातील एका झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. निवृत्ती मारोती चोले यांच्या माहितीवरुन माळाकोळी ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे. तपास हवालदार गिते हे करीत आहेत. 

तर दुसऱ्या घटनेत नांदेड शहरातील गोकूळनगर भागात राहणारे शेतकरी सुनिल बाबुराव कैवारे यांच्याही शेतात उत्पन्न मिळत नव्हते. म्हणून त्यांनी कर्ज काढले. परंतु शेतातील उत्पन्न घटल्याने कर्जाची परफेड वेळेत करु शकत नव्हते. तसेच दोन मुली लग्नाला आल्या होत्या. त्यांचे लग्न कशाने करायचे या विवंचनेत सापडलेल्या सुनिल कैवारे यांनी मंगळवारी (ता. 13) सायंकाळी सहाच्या समारास आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. अनिल कैवारे यांच्या माहितीवरुन शिवाजीनगर ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली. तपास हवालदार गोटमवाड हे करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com