नांदेडला दोन गोडाऊन कॅरीबॅग व प्लॅस्टिक जप्त

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 26 जून 2018

नांदेड : महापालिका आयुक्त लहुराज माळी यांची स्वतः प्लॅस्टिक पिशव्यांवर कारवाई केली. जुना मोंढा भागातील महाराजा रणजितसिंग व्यापारी संकुल येथे मंगळवारी दुपारी दोन वाजता आचानक जाऊन ही कारवाई करण्यात आली.

दोन गोडाऊन मधील प्लॅस्टिकची मोजणी सुरू असून अंदाजे अंदाजे दोन ते चार टन निघण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या व्यापाऱ्याला यापूर्वी दोनदा दंड आकारण्यात आला आहे. सतिश अग्रवाल असे व्यापाऱ्याचे नाव असल्याचे सहाय्यक आयुक्त गुलाम सादेक यांनी सांगितले. यावेळी उपायुक्त माधवी मारकड. सहाय्यक आयुक्त डॉ मिर्झा बेग यांच्यासह स्वच्छता निरीक्षक आदी उपस्थित होते. प्लॅस्टिक बंदी लागू झाल्यापासून ही पहिली मोठी कारवाई आहे.

Web Title: 2 go downs plastic bag seized in nanded