जालन्यात मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने दुचाकी रॅली

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 ऑगस्ट 2018

जालना : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मागील आठ दिवसांपासून ठिय्या आंदोलन सुरु आहे. या आंदोलनस्थळापासून बुधवारी (ता.8) मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने दुचाकी रॅली काढण्यात आली.

ही रॅली छत्रपती संभाजी महाराज पुतळ्यापासून निघाली. ती कचेरी रोडवर मार्गे शनि मंदीर, गांधी चमन, मस्तगड, महावीर चौक, सिंधी बाजार, बडीसडक मार्गे छत्रपती शिवजी पुतळा व काद्राबाद, पाणीवेस, मस्तगड मार्गे छत्रपती संभाजी महाराज पुतळा येथे या दुचाकी रॅलीची सांगता होणार आहे. या दुचाकी रॅली मध्ये मोठ्या प्रमाणावर समाज बांधव सहभागी झाले होते. दरम्यान यावेळी एक मराठा लाख मराठा घोषणांणी यावेळी शहर दुमदुमले. 

Web Title: 2 wheeler rally in jalna maratha kranti morcha