हिंगोलीच्‍या राखीव दलातील 20 जवान निलंबित

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 12 मे 2018

हिंगोली येथील राखीव दलाच्‍या भरतीमध्ये वीस उमेदवारांचे गुण वाढवल्‍याचे स्‍पष्ट झाले होते. या प्रकरणी हिंगोली शहर पोलिस ठाण्यात काल गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर समादेशक योगेशकुमार यांनी भरती झालेल्या या जवानावर कारवाई सुरू केली होती.

हिंगोली : हिंगोली येथील राज्‍य राखीव दल भरतीमध्ये लेखी परीक्षेत गुण वाढवण्याचा घोटाळा उघडकीस आला असून गुण वाढवून भरती झालेले वीस जवान निलंबित करण्यात आले आहेत. या बाबतचे आदेश राखीव दलाचे समादेशक योगेशकुमार यांनी शनिवारी (ता.१२) दुपारी काढले आहेत.

हिंगोली येथील राखीव दलाच्‍या भरतीमध्ये वीस उमेदवारांचे गुण वाढवल्‍याचे स्‍पष्ट झाले होते. या प्रकरणी हिंगोली शहर पोलिस ठाण्यात काल गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर समादेशक योगेशकुमार यांनी भरती झालेल्या या जवानावर कारवाई सुरू केली होती.

आज दुपारी जवान गोविंद बाबूराव ढाकणे, निलेश बाबूराव अंभोरे, सुरेश विश्वनाथ चव्‍हाण, युसूफ फकिर शेख, मुनाफ रफिक शेख, संदीप केशव जुमडे, उद्धव शिवराम धोतरे, अमोल विनोद जावळे, हरिभाऊ लक्ष्मण दुभळकर, विश्वनाथ सदाशिव दळवे, सतीश विलासराव अंभोरे, सुभाष दशरथ रिठाड, किशन रामभाऊ शिंदे, गोरखनाथ धोंडूजी कोकाटे, अमोल विठ्ठल मांदळे, भगवान सुखदेव बोरुडे, बालकृष्ण नामदेव वाघमारे, महादेव रामचंद्र पोवार, विठ्ठल संतोष खरात, विकास फुलचंद डोळे यांच्या निलंबनाचे आदेश काढले आहेत. या मोठ्या कारवामुळे राखीव दलामध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

Web Title: 20 jawan suspended in hingoli

टॅग्स