कापडी पिशव्यांतून 200 महिलांना रोजगार

बचत गटाच्या महिलांनी बनवलेली कापडी पिशवी
बचत गटाच्या महिलांनी बनवलेली कापडी पिशवी

लातूर ः राज्य शासनाने राज्यात प्लॅस्टिक पिशव्याला बंदी घातली असली तरी त्याचा वापर सर्रासपणे सुरू आहे. यासंदर्भात प्रबोधन आणि पर्याय उपलब्ध करून दिल्याशिवाय हा प्रकार थांबणार नाहीत. याकरिता महिला आर्थिक विकास महामंडळाने पुढाकार घेतला आहे. जिल्ह्यातील बचतगटाच्या महिलांना कपड्याच्या पिशव्या शिवण्यास सांगितले. यातून दोनशे महिलांना रोजगार मिळाला. यात 40 हजार कपड्याच्या पिशव्या तयार करण्यात आल्या आहेत. येत्या काही दिवसांत शहरातील महापालिका, नगरपरिषद व जिल्हा परिषदेच्या शाळेतील मुलांना त्या मोफत वाटल्या जाणार आहेत. यातून प्रबोधनही केले जाणार आहे. 

साडेअकरा लाखांचे उद्दिष्ट 
राज्य शासनाने राज्यात प्लॅस्टिक पिशव्यांवर बंदी घातली आहे; पण त्याची प्रभावी अंमलबजावणी मात्र नाही. त्यामुळे अजूनही प्लॅस्टिकच्या पिशव्यांचा सर्रास वापर केला जाताना दिसत आहे. हे लक्षात आल्यानंतर महिला आर्थिक विकास महामंडळाने प्रबोधन करण्यावर भर दिला आहे. याकरिता कापडी पिशव्यांतून प्रबोधन करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. यात राज्यात 11 लाख 45 हजार कापडी पिशव्या तयार केल्या जात आहेत. त्यानंतर त्याचे वाटप केले जाणार आहे. 

बचतगटाच्या महिलांना मिळाला रोजगार 
कापडी पिशव्या शिवण्याचे काम बचतगटाच्या महिलांना दिले जात आहे. यातून महिलांना घरबसल्या रोजगार उपलब्ध होत आहे. जिल्ह्यात 200 महिलांना रोजगार मिळाला. या महिलांनी 40 हजार कापडी पिशव्या तयार केल्या आहेत. शहरातील महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना या पिशव्यांचे मोफत वाटप केले जाणार आहे. 


या उपक्रमाला प्रदूषण महामंडळाचे सहकार्य मिळाले आहे. जिल्ह्यात सुमारे दोनशे महिलांना रोजगार उपलब्ध झाला आहे. आणखी पिशव्यांसाठी प्रस्ताव पाठवण्यात येणार आहे. तसेच येथे नावीन्य उपक्रमांतर्गत कापडी पिशव्या तयार करण्याचे एक मोठे युनिट उभारण्याचा मानस असून, त्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. यातूनही महिलांना मोठा रोजगार मिळेल. 
- एस. एस. पटेल, जिल्हा समन्वयक, महिला आर्थिक विकास महामंडळ, लातूर 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com