esakal | जिल्ह्यात २२ हजार नागरिकांची घरवापसी- कुठे ते वाचा
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

पुणे, मुंबईसह राज्यातील इतर महागानगरामध्ये उपजिविका भागविण्यासाठी गेलेले नागरिक गावी परतले आहेत. एरवी दिवाळी व खास कार्यक्रमानिमीत्त शहरातून आलेल्या नागरीकांची कुतूहलाने चौकशी करणारे ग्रामीण नागरीक कोरोनाच्या धास्तीने त्यांच्या पासून दोन हात लांब आहेत. शुक्रवारी (ता. १३) पर्यंत जिल्ह्यात २२ हजार नागरीक पुणे- मुंबईसह इतर जिल्ह्यातून खेड्यात परतले  आहेत.

जिल्ह्यात २२ हजार नागरिकांची घरवापसी- कुठे ते वाचा

sakal_logo
By
नवनाथ येवले

नांदेड : कोरोना विषाणूचे संक्रमण रोखण्यसाठी देशभरात लॉकडाऊन आहे. राज्यातील प्रमुख शहरात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या वाढत आहे. पुणे, मुंबईसह राज्यातील इतर महागानगरामध्ये उपजिविका भागविण्यासाठी गेलेले नागरिक गावी परतले आहेत. एरवी दिवाळी व खास कार्यक्रमानिमीत्त शहरातून आलेल्या नागरीकांची कुतूहलाने चौकशी करणारे ग्रामीण नागरीक कोरोनाच्या धास्तीने त्यांच्या पासून दोन हात लांब आहेत. शुक्रवारी (ता. १३) पर्यंत जिल्ह्यात २२ हजार नागरीक पुणे- मुंबईसह इतर जिल्ह्यातून खेड्यात परतले  आहेत. यामध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. 

जिल्ह्यात अद्याप एकही कोरोनाचा बाधीत रुग्ण आढळलेला नाही. मात्र, पुणे, मुंबईसह अन्य ठिकाणी कोरोना बाधित रुग्णांचा आकडा शंभरी  पार झाला आहे. त्यामुळे पोटभरण्यासाठी कामाधंद्याच्या शोधात पुणे व मुंबईकडे गेलेले जिल्ह्यातील २२ हजार नागरिक आता खेड्यात  परतले  आहेत. जिल्हा बाहेरून येणाऱ्या नागरीकांमुळे गावचे नागरीक सजग झाले आहेत. त्यांच्यापासून सुरक्षित अंतर ठेवत आहेत.
 
हेही वाचा -  नांदेडला किराणा घरपोच मिळणार, काळजी करु नका...

ग्रामीण नागरीक सजग 
पूर्वी दिवाळी, उत्सव किंवा कार्यक्रमानिमित्त परगावी गेलेल्यांची जुनी आठवणी काढत गप्पा रंगत, मात्र आता गावातील पारावर एकच चर्चा आहे ती म्हणजे कोरोना. "कोरोना'च्या भीतीने खेड्यात आलेली अनेक मंडळी शेतात काम करत आहेत. दरम्यान, प्रत्येक गावात खबरदारीसाठी जिल्हा प्रशासनाच्या कोरोना प्रतिबंधित समीत्यांमार्फत पोलिस पाटील, ग्रामसेवक, आंगणवाडी  कर्मचारी, आरोग्य  कर्मचार्यांचे पथक बाहेरून आलेल्या प्रत्येकाची नोंद घेत आहेत. गावात दक्षतेविषयी जागृती करण्यात येत आहे. दिवसभर काम करून रात्री थोडा थकवा घालवण्यासाठी गावातील पारावर किंवा एखाद्या भिंतीच्या कोपऱ्यावर गप्पात दंग असलेले टोळके आता या कोरोनामुळे येणे बंद झाले आहे.

१८४ जन होम क्वॉरंटाईन 
जिल्हयातील विविध चेक पोस्टवर जिल्हा आरोग्य विभागामार्फत इतर जिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांच्या आरोग्य तपासण्या करण्यात आल्या. लॉकडाऊनपूर्वी जिल्ह्यातील चेक पोस्टवर जिल्हा आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या होत्या. देशभरात लॉकडाऊनमुळे चेकपोस्टवरील आरोग्य कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या मुळजागी देण्यात आल्या आहेत. कोरोणाचा संसर्ग रोखण्यासाठी गावपातळीवर कोरोणा १८४ संशयीतांना होम क्वॉरंटाईन करण्यात आले असून त्यांना घरातच राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

येथे क्लिक करामाहूरच्या खासगी डॉक्टरांच्या कार्याला ‘सलाम’
                                
२९ जनांचे  रिपोर्ट  निगेटीव्ह  
जिल्हा आरोग्य विभामार्फत २९  संशयित रुग्णांचे स्वॅप नमुने तपासणीसाठी  पाठवण्यात  आले  होते . शुक्रवारी या सर्व २९ रुग्णांचे  रिपोर्ट निगेटिव्ह आले  आहेत. प्राथमिक  आरोग्य  केंद्रात  उपचारार्थ  दाखल  होणार्या  संशयित रुग्णांचे स्वॅप तपासणीसाठी  पाठवण्यात  येत  आहेत.     

loading image