"त्या' 22 हजार इंजेक्‍शनचा झाला वापर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 नोव्हेंबर 2018

औरंगाबाद - घाटीला हाफकिनमार्फत ऑक्‍टोबर महिन्यात इंदूरच्या नंदिता मेडिकल लॅबोरेटरीज प्रा. लि. या कंपनीने 80 हजार रॅनिटिडीन इंजेक्‍शनचा पुरवठा केला होता. त्यातील काही इंजेक्‍शनमध्ये गुरुवारी (ता. 22) काळपट बुरशीजन्य पदार्थ आढळला. त्यामुळे या साठ्याचा वापर थांबवला असला, तरी 22 हजार इंजेक्‍शन वापर झाल्याचे बुधवारी (ता. 28) समोर आल्याने चिंता व्यक्त होत आहे. हाफकिन महामंडळाकडून पुरवठा झाल्याने या खरेदी व पुरवठा यंत्रणेतील उणिवा या औषधी पुरवठ्यातून समोर आल्या. घाटीत इंजेक्‍शन सदोष असल्याचे औषध प्रशासनाने (एफडीए) सोमवारी (ता. 26) 20 हजार इंजेक्‍शनचा साठा गोठवला होता.
Web Title: 22000 Injection Use