दुकानाचा पत्रा कापून 23 हजारांचे साहित्य चोरले

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 ऑगस्ट 2019

पैठण-औरंगाबाद या मुख्य रस्त्यावरील भीमाशंकर विद्यालयासमोर असलेले किराणा दुकान रविवारी (ता.11) मध्यरात्री चोरट्यांनी फोडले. दुकानाचा पत्रा कापून आत प्रवेश करीत 23 हजार रुपयांचे साहित्य चोरट्यांनी चोरून नेले.

जायकवाडी (जि.औरंगाबाद) : पैठण-औरंगाबाद या मुख्य रस्त्यावरील भीमाशंकर विद्यालयासमोर असलेले किराणा दुकान रविवारी (ता.11) मध्यरात्री चोरट्यांनी फोडले. दुकानाचा पत्रा कापून आत प्रवेश करीत 23 हजार रुपयांचे साहित्य चोरट्यांनी चोरून नेले.

पैठण-औरंगाबाद रस्त्यावर भीमाशंकर विद्यालयासमोर यश किराणा नावाचे दुकान आहे.
मध्यरात्री चोरट्यांनी दुकानाच्या मागील पत्रा कापून दुकानात प्रवेश करीत गल्ल्यातील रोख 2 हजार 800 रुपये व सिगारेट, तंबाखू, बिडी असा एकूण 23 हजार 800 रुपयांचा माल चोरून नेला.

सकाळी दुकान उघडण्यासाठी आलेल्या दुकानमालकास हा प्रकार निदर्शनास आला. याप्रकरणी एमआयडीसी पैठण पोलिस ठाण्यात माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. याप्रकरणी सुनील घुले यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 23 thousand materials steal