औरंगाबाद : पुरामुळे 23 गावांचा विद्युतपुरवठा सुरक्षेसाठी बंद

अनिलकुमार जमधडे
सोमवार, 5 ऑगस्ट 2019

औरंगाबाद - नाशिक जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे औरंगाबाद जिल्ह्यात गोदावरी नदीला पूर आला आहे. पूरपरिस्थितीमुळे वैजापूर तालुक्यातील गोदावरी नदीकाठच्या 23 गावांचा विद्युतपुरवठा रविवारी (ता. 4) रात्रीपासून सुरक्षेसाठी बंद ठेवण्यात आला आहे.

गंगापूर तालुक्यात केवळ नदीकाठच्या वस्त्यांवरील काही घरे वगळता सर्व गावांचा विद्युतपुरवठा सुरू आहे.  पूर स्थितीमुळे खबरदारीचा उपाय म्हणून वैजापूर व गंगापूर तालुक्यातील 8‍ विद्युत उपकेंद्रांतर्गत येणाऱ्या 22 उच्चदाब वाहिन्या बंद ठेवण्यात आल्या आहेत. तसेच 658 रोहित्रांवरील 5 हजार 56 ग्राहकांचा विद्युतपुरवठा बंद ठेवण्यात आला आहे.

बंद ठेवलेले रोहित्र हे प्रामुख्याने नदीकाठी असलेल्या कृषिपंपांचे आहेत. महावितरणच्या औरंगाबाद परिमंडलाचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी परिस्थितीचा आढावा घेऊन अभियंते व कर्मचाऱ्यांना आपात्कालिन परिस्थितीत सज्ज राहण्याचे निर्देश दिले आहेत. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 23 villages Electricity Power supply off due to flood for security reasons