अबब...! २४ लाख ५७ हजारांचा गुटखा पकडला

कारवाइ करताना पोलिस कर्मचारी .
कारवाइ करताना पोलिस कर्मचारी .

पाथरी (जि.परभणी) : पाथरीमार्गे सेलूकडे जाणाऱ्या ट्रकचा संशय आल्याने पोलिसांनी तपासणी केली असता यात २४ लाख ५७ हजार रुपयांचा गुटखा आढळला. ही कारवाई शनिवारी (ता.१८)  पहाटे ३:३० वाजेच्या सुमारास करण्यात आली. याप्रकरणी ट्रक चालकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पाथरीमार्गे सेलूकडे ट्रक क्रमांक (एम. एच.-१२ के. पी.-५०१५) मधून गुटखा, पानमसाला नेला जात असल्याची माहिती पोलिस निरीक्षक दीपक शिंदे यांना मिळाल्या नंतर पोलिस शिपाई विठ्ठल करे, चालक भगिरथ जाधव, अलीम शेख, सतीश साठे यांनी संशयीत ट्रक पकडला. चालकाकडे चौकशी केली असता, त्याने उडवा उडवीचे उत्तरे दिली. परंतू, पोलिसांना संशय वाढल्याने. त्यांनी ट्रकचा मागील दरवाजा उघडला असता, त्यात प्लॅस्टिक पोत्यांमध्ये पान मसाला व  गुटखा आढळून आला. पोलिसांनी ट्रक ठाण्यात आणल्यानंतर तपासणी केली. 
यात मोठ्या ३० पोत्यांमधून प्रत्येकी ५२ पाकीट गुटखा आढळून आला. ज्याची किंमत  २४ लाख ५७ हजार रुपये आहे. याप्रकरणी पाथरी तालुका पोलिसांनी अन्न व औषध प्रशासन अधिकारी अ. मा. तमडवार यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा नोंद केला. अखिल रसुल साब  (रा.बसवकल्याण, कर्नाटक) व  हनुमंत कुपेंन्द्र गुरव  (रा. गोकुळ नगर कात्रज, पुणे)  या दोघांना ताब्यात घेतलेले आहे.

हेही वाचा ...


आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी

कळमनुरी  (जि.हिंगोली) : गोवा येथील स्वस्त दारू रिकाम्या बॉटलमध्ये भरून विक्री केल्या प्रकरणी पोलिस कोठडीत असलेल्या दोन आरोपींची शनिवारी (ता.१८) न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, औंढा नागनाथ तालुक्यातील पिंपळदरी येथील एका शेतीच्या आखाड्यावर गोवा राज्यातील स्वस्त दारू महागड्या विदेशी दारूच्या बॉटलमध्ये भरून त्याची विक्री केली जात होती. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस निरीक्षक जगदीश भंडारवार, उपनिरीक्षक शिवसांभ घेवारे यांच्या पथकाने मागील महिन्यात (ता.२४) या कारखान्यावर छापा टाकत एकूण ४५ हजार रुपयांच्या मुद्देमालासह साहित्य जप्त करण्यात आले होते. तसेच याप्रकरणी विवेक पांपटवार, शेख बुरहान शेख कासिम, गजानन रिठे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. पोलिस निरीक्षक रणजीत भोईटे, गणेश सूर्यवंशी, निरंजन नलवार, विकी ऊरेवार यांनी या प्रकरणामधील आरोपींचा शोध चालविला होता. गुरुवार (ता.१६) कळमनुरी पोलिसांनी पिंपळदरी येथून या प्रकरणातील आरोपी विवेक पांपटवार व गजानन रिठे यांना ताब्यात घेतले होते. त्यांना औंढा येथील न्यायालयासमोर उभे केले असता त्यांना दोन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली होती. आरोपींच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्यानंतर शनिवारी (ता.१८) आरोपींना न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने या आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली असल्याची माहिती पोलिस निरीक्षक श्री. भोईटे यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com