24 विद्यार्थी हृदय शस्त्रक्रियेसाठी मुंबईला रवाना

तानाजी जाधवर
सोमवार, 28 जानेवारी 2019

उस्मानाबाद : सुपर स्पेशालिटी शिबीरातून निवडलेल्या 24 विद्यार्थ्यांना हृदय शस्त्रक्रियासाठी मुंबई येथे पाठविण्यात आले. (ता. 28) जिल्हा रुग्‍णालयातुन या मुलांना पाठविण्यात आले असुन 18 व 19 जानेवारीला भव्य सुपर स्पेशालिटी आरोग्य मेळावा घेण्यात आला होता. त्यातील 0 ते 18 वर्षे वयोगटातील संशयित हृदयरोग विद्यार्थ्यांची मोफत तपासणी करण्यात आली. त्यानंतर सर्व तपासणी नंतर पुढील शस्त्रक्रियासाठी (ता. 28) 24 विद्यार्थ्यांना मुंबई येथे उस्मानाबाद येथून रुग्णवाहीका मार्फत मुंबईस रवाना करण्यात आले असुन लवकरच त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.

केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सुचनेनुसार प्रत्येक लोकसभा मतदार संघामध्ये जनतेस उपचारात्मक व प्रतिबंधात्मक दर्जेदार मोफत आरोग्य सेवा मिळण्याच्या दृष्टीकोनातुन जिल्हा रुग्णालयात 18 व 19 जानेवारीला भव्य सुपरस्पेशॅलीटी आरोग्य मेळावा आयोजित करण्यात आला होती. या शिबीरामध्ये राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत 0 ते 18 वयोगटातील संशयीत हृदयरोग विद्यार्थ्यांची मोफत 2 डी ईको तपासणी करण्यासाठी बालाजी हॉस्पिटल (मुंबई) येथील सुप्रसिध्द हृदय रोगतज्ञ डॉ. पराग सुमितलाल ज्योती भळगट व त्यांचे पथक (ता.18) जिल्हा रुग्णालय उस्मानाबाद येथे दाखल झाले होते. विशेषतज्ञांच्या पथका मार्फत 59 बालकांची 2 डि ईको तपासणी करण्यात आली असुन 24 विद्यार्थ्यांना हृदय शस्त्रक्रिया व पुढील उपचाराचा सल्ला देण्यत आला होता. संबंधीत बालकांना बालाजी हॉस्पीटल मुंबई येथे मोफत हृदयशस्त्रक्रिया व पुढील उपचार करुन घेण्यासाठी मुंबई येथे विद्यार्थ्यांना नेण्यासाठी तीन-रुग्णवाहीका व तीन-वैद्यकीय पथकाची व्यवस्था करण्यात आली आहे.

बालाजी हॉस्पीटल मुंबई येथे बालाकांचे पुढील उपचार, शस्त्रक्रिया होईपर्यंत बालक व पालकांची मोफत राहण्याची, जेवणाची सोय देखील करण्यात आली आहे. तसेच या शिबीरामधील तीन रुग्णांची शस्त्राक्रिया शासकिय वैद्यकिय महाविद्यालय सोलापूर येथे यशस्वी झाल्या.शिबीरातील 39 मोतीबिंदू ,तीन गर्भाशय पिशवी शस्त्राक्रिया व तीन कान नाक घसा शस्त्राक्रिया तसेच आठ जनरल सर्जरी शस्त्राक्रिया असे एकूण 53 रुग्णांची शस्त्राक्रिया पार-पडल्या आहेत. उर्वरीत 153 रुग्णांची शस्त्राक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्यात येणार असल्याचे डॉ.आर.व्ही. गलांडे यानी सांगितले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 24 students went to Mumbai for heart surgery