नगरसेवकाच्या घरी पेपर सोडवताना 25 विद्यार्थी ताब्यात

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 मे 2017

शहरातील हर्सूल परिसरातील नगरसेवक सुरे यांच्या घरी अभियांत्रिकीच्या द्वितीय वर्षाची परिक्षा झालेले पेपर पुन्हा सोडवताना बावीस तरूण आणि तीन मुलींसह काही प्राध्यापकांना गुन्हे शाखेच्या पथकाने आज (बुधवार) ताब्यात घेतले आहे.

औरंगाबाद - शहरातील हर्सूल परिसरातील नगरसेवक सुरे यांच्या घरी अभियांत्रिकीच्या द्वितीय वर्षाची परिक्षा झालेले पेपर पुन्हा सोडवताना बावीस तरूण आणि तीन मुलींसह काही प्राध्यापकांना गुन्हे शाखेच्या पथकाने आज (बुधवार) ताब्यात घेतले आहे.

गुन्हेशाखेचे पोलिस निरीक्षक मधूकर सावंत यांनी याबाबत माहिती दिली. ते म्हणाले, की सिडको भागातील नगरसेवक सीताराम सुरे यांच्या घरी अभियांत्रिकीचे विद्यार्थी पेपर सोडवत असल्याची माहिती गुन्हेशाखा पोलिसांना समजली. त्यानंतर सकाळी गुन्हेशाखेचे उपनिरीक्षक बांगर व त्यांच्या पथकाने तेथे छापा घातला. त्यावेळी अभियांत्रिकीच्या बांधकाम (सिव्हील) विद्याशाखेचे बिल्डींग कन्स्ट्रक्‍शन्स या विषयाचे पेपर पुन्हा सोडवताना तब्बल 22 तरूण व तीन तरूणी तसेच प्राध्यापक पोलिसांना आढळले. नगरसेवकाच्याच घरी असा प्रकार उजेडात आल्याने मोठी खळबळ उडाली असून, पोलिसांची पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरु आहे.

Web Title: 25 engineering students illegally writing paper in corporators house; 25 students arrested