गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानकडून पंतप्रधान सहायता निधीला २५ लाख 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 30 March 2020

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राला पीएम केअर फंडसाठी हाक दिली. या हाकेला तत्काळ प्रतिसाद देत पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानतर्फे २५ लाख रुपयांचा निधी देऊ केला.

बीड -  कोरोनाविरुद्धच्या लढ्यात देश एकजुटीने उतरला आहे. या कामात माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठाननेही २५ लाख रुपये पंतप्रधान सहायता निधीला दिले.

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी सरकार वेगवेगळ्या पातळींवर सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. कोरोनावर मात करून देशातील जनतेला संकटातून बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकारने विविध उपाययोजनांकरिता मोठा निधी जाहीर केला आहे.

हेही वाचा - कोरोना विषाणू येऊच नये म्हणून....

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राला पीएम केअर फंडसाठी हाक दिली. या हाकेला तत्काळ प्रतिसाद देत पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानतर्फे २५ लाख रुपयांचा निधी देऊ केला. कोरोनाविरुद्धची लढाई जिंकण्यासाठी देशातील नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देणे हीच आमच्यासाठी सध्या महत्त्वाची बाब आहे, असे ट्विट करीत त्यांनी प्रत्येकाला पुढे येऊन सढळ हाताने मदत करण्याचे आवाहन केले आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 25 lakh assistance from the Gopinath Munde Foundation