हिंगोली जिल्ह्यात २८ कोटीच्या टंचाई आराखड्यास मंजूरी

file photo
file photo

हिंगोली : जिल्ह्यातील संभाव्य  पाणीटंचाई लक्षात घेता  जिल्हा परिषदेने तयार केलेल्या सुमारे २८ कोटी ७२ लाख ६२ हजार रुपयाच्या टंचाई आराखड्यास जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी मंजूरी दिली आहे.

यंदाच्या पावसाळ्यात परतीच्या पावसाने जोरदार आगमन करून माघार घेतली त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदाच्या उन्हाळ्यात पाणी टंचाई त्याप्रमाणात जाणवणार नाही हे गृहीत धरुन जिल्हा परिषदेने थेट जानेवारी ते जून या कालावधीतलाच टंचाई कृती आराखडा तयार केला. सदर आराखडा नुकताच मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे प्रत्यक्ष पाणीटंचाई होण्यापूर्वीच टंचाईच्या कामांना सुरुवात होण्यास मदत होणार आहे संभाव्य पाणी टंचाई विचारात घेऊन नवीन विहीरी घेणे, नळ- उपाययोजना पाणी पुरवठा योजनांची दुरूस्ती , तात्पुरत्या पूरक नळ- पाणी पुरवठा योजना सुरू करणे , टँकर , विहीरी करणे आदी विविध कामे सुचविण्यात आली आहेत. ती सर्व कामे सोयीस्कर आराखड्यात समाविष्ट करण्यात आली आहेत.

त्यामध्ये तात्पुरती पुरक नळ योजनेसाठी ३०८ गावात ३२१  कामांसाठी १७ कोटी २६ लाख ८० हजार रुपयांच्या कामास मंजूरी देण्यात आली आहे. नळ योजनेच्या गावामध्ये दुरुस्तीसाठी ६१ गावांतील तेव्हढ्याच कामांसाठी ३ कोटी ८ लाख, विंधन विहीरीची विशेष दुरूस्ती यात दोन  गावासाठी  १९ कामासाठी ११.४० लाख , विद्युत टँकरने पंप निरंक ठेवण्यात आली आहेत . नवीन विंधन विहिरमध्ये ३३७ गावात ५११ कामांसाठी ३१६.८२ लाख , खाजगी विहीर अधिग्रहीत करणे यात ३३५ गावे संख्या ५८९ किंमत ३१८.०६ लाख रुपये मंजूर करण्यात आली  आहेत.

विहीर खोलीकरण व गाळ काढणे यासाठी १४ गावामध्ये ४७.२४ लाख रुपये प्रस्तावित करण्यात आली आहेत. बुडक्या घेणे यासाठी ६ गावामध्ये संख्या ८ यासाठी २.६ लाख रुपये मंजूर करण्यात आली आहेत . टँकरने पाणीपुरवठा करणे यासाठी ३४ गावातील ५२ टँकरसाठी १४१.२० लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

संपादन- प्रल्हाद कांबळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com