Investment Fraud : २९ लाखांची गुंतवणूक करायला लावून फसवणूक; पुण्यातील व्यक्तीविरुद्ध गुन्हा
Dharashiv News : पुण्यातील स्थावर मालमत्तेत २९ लाख रुपयांची गुंतवणूक करायला लावून धाराशिवमधील विनोद गपाट यांची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी आनंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
धाराशिव : आर्थिक फायदा मिळवून देण्याच्या बहाण्याने पुण्यात स्थावर मालमत्तेत तब्बल २९ लाख रुपयांची गुंतवणूक करायला लावत धाराशिवमधील नागरिकाची फसवणूक केली आहे.