अन्नभेसळ प्रकरणी 34 व्यापाऱ्यांना साडेतीन लाखाचा दंड 

प्रल्हाद कांबळे
गुरुवार, 25 एप्रिल 2019

अन्न भेसळ प्रतिबंधक कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या जिल्ह्यातील 34 व्यापाऱ्यांना 19 गुन्ह्यात नांदेड न्यायालयाने साडेतीन लाखाच्या दंडाची शिक्षा सुनावली. 

नांदेड : अन्न भेसळ प्रतिबंधक कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या जिल्ह्यातील 34 व्यापाऱ्यांना 19 गुन्ह्यात नांदेड न्यायालयाने साडेतीन लाखाच्या दंडाची शिक्षा सुनावली. 

जिल्ह्यात विविध अन्न पदार्थात भेसळ करून सर्वसामान्यांच्या आरोग्यासी खेळ करणाऱ्या व्यापाऱ्यांविरूध्द अन्न व औषध प्रशासनाकडून गुन्हा दाखल करण्यात आला होता. ही सर्व प्रकरणे 2011 पूर्वीचे होते. व्यापाऱ्यांकडून जप्त केलेले अन्न पदार्थ तपासणीअंती अप्रमाणीत असल्याचे सिध्द झाले. यावरून 34 व्यापाऱ्यांविरूध्द न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झाले. न्यायाधीश हिवाळे, न्यायाधीश भोळे आणि न्यायाधीश घुले यांनी याप्रकरणांची सुनावणी घेतली. या प्रकरणात सरकार पक्षाची बाजू अॅड. कळसकर यांनी लावून धरली होती.

न्यायालयने या 34 व्यापाऱ्यांना आर्थिक दंड म्हणून 3 लाख 44 हजाराची शिक्षा सुनावली. ही दंडाची रक्कम व्यापाऱ्यांनी न्यायालयात जमा केली. मागील सात आठ वर्षापासूनचे प्रकरणाचा अखेर शेवट झाला. यावेळी अन्न व औषध प्रशासनाचे अन्न- सुरक्षा अधिकारी प्रविण काळे यांची उपस्थिती होती.

Web Title: 3 and half lakhs fine to 34 merchants for food adulteration in Nanded