गोदावरी पात्रात वाहून गेलेल्या त्या तीन मुलांचा शोध सुरू

प्रल्हाद कांबळे
शुक्रवार, 13 सप्टेंबर 2019

गणेश विसर्जनाच्या दिवशी नगिनाघाट परिसरातून वाहून गेलेल्या त्या तीन मुलांचा शोध सुरू करण्यात आला आहे.

नांदेड : गणेश विसर्जनाच्या दिवशी नगिनाघाट परिसरातून वाहून गेलेल्या त्या तीन मुलांचा शोध सुरू करण्यात आला आहे. गोदावरी नदीपात्रात पाणी आल्याचे समजल्यानंतर नदीतील पाणी व गणेश विसर्जन पाण्यासाठी गेलेल्या तीन युवक वाहून गेल्याची तक्रार त्यांचे ठेकेदार नंदी मिस्त्री यांनी शुक्रवारी दुपारी वजीराबाद पोलिस ठाण्यात येऊन तक्रार दिली आहे.

वाहून गेलेल्यांमध्ये अरविंद, धर्मेंद्र आणि रामनिवास ही सोळा ते सतरा वयोगटातील मुलांची नावे असल्याचे त्यांनी सांगितले. गुरुद्वारा लंगर साहेब बांधकामावर ते मजूर म्हणून कामासाठी आले होते. याप्रकरणी वजिराबाद पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संदीप शिवले यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, गुरुवारी (ता. 12) दुपारी अडीच वाजता गोदावरी नदी पात्रात पाणी आल्याचे सदर युवकांना बांधकामावर समजले. 

नदीपात्रात उतरताच पाण्याचा प्रवाह मोठा असल्याने उत्तर प्रदेशातील आजमगड येथील अरविंद हरगुन, धर्मेंद्रा आणि रामनिवास निषाद हे तीन युवक वाहून गेल्याचे त्यांनी सांगितले. आहे. कालपासून गोदावरी जीवरक्षक, जिल्हा प्रशासनाचे आपत्ती व्यवस्थापन, अग्निशमन दल आणि पोलिसांच्या वतीने त्यांचा शोध सुरू असून तिघांपैकी अद्याप एकही युवक सापडला नसल्याचे सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 3 boys downing in the godavari River