वाहनाच्या धडकेत तीन तरुण ठार

वैजीनाथ जाधव
शनिवार, 20 जुलै 2019

सकाळी लवकर व्यायाम काढण्यासाठी राष्ट्रीय महामार्गावर गेलेल्या तीन तरुणांना अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली. यात तिघेही जागीच ठार झाल्याची घटना शनिवारी (ता. 20) तालुक्यातील तळेवाडी येथे घडली. 

गेवराई (जि. बीड) : सकाळी लवकर व्यायाम काढण्यासाठी राष्ट्रीय महामार्गावर गेलेल्या तीन तरुणांना अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली. यात तिघेही जागीच ठार झाल्याची घटना शनिवारी (ता. 20) तालुक्यातील तळेवाडी येथे घडली. 

क्रमांक 61 वर गेले असता वाहनांच्या धडकेने तीन तरुण ठार झाल्याची घटना वाहतूक पोलीस चौकी जवळील तळेवाडी फाटा येथे घडली. अभिषेक भगवान जाधव(वय 13), सुनिल पिंटू थोटे (वय 16), तुकाराम विठ्ठल यमगर (वय 18) (सर्व राहणार तळेवाडी) असे या तरुणांची नावे आहेत. 

तालुक्यातील तळेवाडी येथील अभिषेक जाध, सुनिल थोटे व तुकाराम यमगर(वय 18) हे दिघे मित्र शनिवारी सकाळी सहा च्या दरम्यान तळेवाडी येथून व्यायाम काढण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 61 (कल्याण - विशाखापट्टणम) वर गेले. गढी (ता. गेवराई) - माजलगाव रस्त्यावरील वाहतूक पोलीस चौकी जवळ रोडवर व्यायाम काढत असताना अज्ञात वाहनाने धडक दिली. यात अभिषेक जाधव व तुकाराम यमगर हे जागीच ठार झाले. तर, थोटे सुनील हा गंभीर जखमी झाला.  त्याचाही उपचारा दरम्यान मृत्यू झाला.या तिन्ही तरुणांचा अपघाती मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 3 dies in accident at Gevrai