मुदखेडमध्ये 300 जणांना विषबाधा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 एप्रिल 2018

मुदखेड - मुदखेड येथील नई आबादी परिसरात एका लग्नात बिर्याणी खाल्ल्याने  300 जणांना विषबाधा झाली आहे. यातील  16 रूग्णांना अतिदक्षता म्हणून नांदेडच्या जिल्हा शासकीय रूग्णालयात पाठविण्यात आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की.  नईआबादी या मुस्लिम वसाहतीत एका विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. विवाहानंतर जेवणात  वर्हाडी मंडळींनी बिर्याणी खाल्ली. त्यानंतर सायंकाळपर्यंत अनेकांना त्रास होऊ लागल्याने एकेक करून रूग्ण स्थानिक शासकीय रूग्णालयात दाखल होऊ लागले. सायंकाळपर्यंत ती संख्या तीनशेवर पोहोचली. त्यातील गंभीर अशा १६ रूग्णांना पुढील उपचारासाठी नांदेडला रेफर करण्यात आले..

दरम्यान, एवढ्या मोठ्या संख्येने दाखल झालेल्या रूग्णांवर उपचार करण्यासाठी येथील ग्रामीण रूग्णालयात पुरेसे डाॅक्टर्स, परिचारिका व इतर स्टाफ उपलब्ध नसल्याने रूग्णांचे हाल झाले. त्यातच रूग्णालयाचे अधिक्षक संजय मनातकरही अद्यापपर्यंत रूग्णालयात पोहोचले नव्हते. ते चार दिवसांपासून रजेवर असल्याचे समजते. शहरातील खासगी रूग्णालये व लष्कराच्या सीआरपीएफ रूग्णालयातील सर्व डाॅक्टर्स मात्र सेवेसाठी उपस्थित आहेत.

Web Title: 300 people food poisoning in Mudkhed