मुदखेडमध्ये तीनशे जणांना बिर्याणीतून विषबाधा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 एप्रिल 2018

मुदखेड - मुदखेड येथील नवी आबादी परिसरात रविवारी (ता. २९) एका लग्नसमारंभात बिर्याणीतून तीनशे जणांना विषबाधा झाली आहे. मुदखेडच्या ग्रामीण रुग्णालयात त्यांना उपचारार्थ दाखल केले आहे. त्यातील ७० जणांना पुढील उपचारासाठी नांदेडला हलविण्यात आले आहे. 

येथील नवी आबादी परिसरात रविवारी सकाळी मौलाना मुर्तुजा पठाण यांच्या घरी मुलीचे लग्न होते. या लग्नामध्ये वऱ्हाडी मंडळींसाठी बिर्याणी आणि इतर गोड पदार्थ बनवण्यात आले होते. बिर्याणी खाल्ल्यानंतर दुपारी दोन वाजल्यापासून वऱ्हाडींना चक्कर येणे आणि उलटीचा त्रास सुरू झाला.

सायंकाळी सहाच्या दरम्यान मुदखेड ग्रामीण रुग्णालयाकडे वऱ्हाडी मंडळींनी धाव घेतली. दरम्यान, वैद्यकीय अधिकारी डॉ. कपिल वैद्य आणि डॉ. कपिल जाधव यांनी परिस्थिती पाहून उपचारासाठी तत्काळ शहरातील खासगी डॉक्‍टरांना बोलाविले. तसेच मुदखेड सीआरपीएफचे पोलिस महानिरीक्षक आर. के. यादव यांनीदेखील त्यांच्याकडील वैद्यकीय अधिकारी डॉ. मिश्रा यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी उपलब्ध करून दिले.

Web Title: 300 people poisoning by biryani