शिक्षकाचे चक्क 31 प्रकार

संतोष मुळी
शुक्रवार, 21 जून 2019

शिक्षण क्षेत्रात ही नवीन व्यवस्था शासन निर्माण करीत आहे. केवळ शासकीय तिजोरीचा भार कमी करण्यासाठी ही योजना असावी. मात्र, यामुळे गुणवंत विद्यार्थी या महत्त्वाच्या शिक्षण क्षेत्रात फिरकणार नाहीत.
- डी. के. देशमुख, माजी शिक्षक आमदार.

माजलगाव (बीड) - गेल्या दहा वर्षांपासून बदलत्या शिक्षण व्यवस्थेबरोबरच शिक्षण क्षेत्रात शिक्षकाची शासकीय परिभाषा तब्बल 31 प्रकारांत मोडत असल्याचे दिसून आले आहे. शिक्षकाचे विविध प्रकार असले, तरी शिक्षण सेवा देण्याचे पवित्र कार्य मात्र सुदैवाने एकच आहे.

एकीकडे भरपूर वेतन घेणारा शिक्षक, तर त्याच शाळेत दहा ते पंधरा वर्षांपासून रोजंदारीपेक्षा कमी वेतनावर ज्ञानदान करणारा शिक्षक, असा विरोधाभास असल्याचे चित्र दिसत आहे. शासनाकडून ठोस काही तरी पदरात पडेल, या अपेक्षेने राज्यात वीस हजारांपेक्षा अधिक शिक्षक काम करीत आहेत. अन्य कोणत्याही क्षेत्रांत एकाच पदाचे एवढे प्रकार दिसून येत नाही. मात्र, 31 प्रकारचे शिक्षक राज्यातील विविध शाळा-महाविद्यालयांतून काम करीत आहेत.

...असे आहेत शिक्षकांचे प्रकार
1. 100 टक्के अनुदानित
2. अंशतः अनुदानित
3. विनाअनुदानित
4. कायम विनाअनुदानित
5. स्वयं अर्थसाहायित
7. पदवाढ प्रस्तावित
8. वैयक्तिक मान्यता प्रलंबित
9. आर्थिक तरतुदींच्या प्रतीक्षेतील
10. पात्र घोषित तुकडीवरील
11. अघोषित
12. अनुदानास पात्र
13. अनुदान प्रतीक्षेतील
14. शिक्षण सेवक
15. जुनी पेन्शन योजना लागू असणारे
16. अंशदान पेन्शन योजनेतील
17. नवीन पेन्शन योजना लागू झालेले
18. कपात नसणारे
19. इंग्रजी माध्यमातील
20. रात्रशाळेतील
21. अल्पसंख्याक शाळेतील
22. अर्धवेळ
23. तासिकेवरील
24. कंत्राटी
25. पूर्णवेळ झालेला
26. मान्यतेच्या प्रतीक्षेत
27. अतिरिक्त
28. कला
29. क्रीडा
30. नवीन
31. टांगती तलवार असलेला


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 31 Types Teacher in education field