Beed Crime : ३५ हजारांत बेकायदा गर्भलिंगनिदान व गर्भपात केंद्राचा भांडाफोड; डमी गर्भवतीला पाठवून छापा

बीड जिल्ह्यात मुलींचा जन्मदर वाढला असतानाच पुन्हा एकदा बेकायदा गर्भलिंग निदान व गर्भपात केला जात असल्याचा प्रकार गुरुवारी (ता. चार) समोर आला.
Beed Crime : ३५ हजारांत बेकायदा गर्भलिंगनिदान व गर्भपात केंद्राचा भांडाफोड; डमी गर्भवतीला पाठवून छापा

- दत्ता देशमुख/वैजिनाथ जाधव

बीड/गेवराई - एकेकाळी बेकायदा गर्भलिंग निदान व स्त्री भ्रूण हत्येच्या प्रकारांमुळे चर्चेत आलेल्या जिल्ह्यात मुलींचा जन्मदर वाढला असतानाच पुन्हा एकदा बेकायदा गर्भलिंग निदान व गर्भपात केला जात असल्याचा प्रकार गुरुवारी (ता. चार) समोर आला. आरोग्य विभाग व पोलिस प्रशासनाने छापा टाकून गेवराईतील संजय नगर भागातील या बेकायदा गर्भलिंग निदान व गर्भपात केंद्राचा भांडाफोड केला.

मनीषा शिवाजी सानप (वय ४०, रा. अर्धमसला, ता.गेवराई) व चंद्रकांत पांडुरंग चंदनशिव (वय ४५, रा. संतोषनगर, गेवराई) व डॉ. सतीश गवारे (रा. जालना) अशी संशयित आरोपींची नावे आहेत. यातील डॉ. गवारे याने पोलिसांशी झटापट करुन पळ काढला. या ठिकाणी सोनोग्राफी मशिन, गर्भपाताची औषधे व उपकरणे आढळली आहेत.

मनिषा सानप गेवराईतीलच एका घरात ती डॉ. सतीश गवारे याला बोलावून महिलांचे बेकायदा गर्भलिंग निदान करत होती. बीड तालुक्यातील सिताबाई उर्फ शितल गाडे या महिलेच्या बेकायदा गर्भलिंग निदानानंतर गर्भपात केला होता. यानंतर या महिलेच्या मृत्यूनंतर हा प्रकार उघड झाला होता. आता पुन्हा मनिषा सानप हीने गेवराईतील संजय नगर भागातील चंद्रकांत चंदनशिव याच्या घरात हा प्रकार सुरु केला होता.

याबाबत आरोग्य विभागाला तक्रार प्राप्त झाल्यानंतर आरोग्य विभाग व पोलिस प्रशासनाने डमी महिलेला पाठवून तिचे गर्भलिंग निदान व गर्भपात करायचा असल्याचे सांगून या बेकायदा गर्भलिंग निदान व गर्भपात केंद्राचा छडा लावला. याप्रकरणी गेवराई पोलिस ठाण्यात उशिरा गुन्हा दाखल कररण्यात आला.

कारवाईत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक बडे, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलिस निरीक्षक संतोष साबळे, एचटीयुच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक सुरेखा धस, वैद्यकीय अधीक्षक डॉ. मोहमंद नोमानी, ॲड.निलेश जोशी, सुनिता शिंदे, डॉ. राजेश शिंदे, डॉ.गोपाळ रांदड, राजु काळे, श्री. माने, गणेश नाईकनवरे, फौजदार जगदीश मोरे, पी. टी. चव्हाण, गणेश हंगे, नारायण कोरडे, सुनिल राठोड, चंद्रभागा मुळे, मनिषा राऊत, सतिश बहिरवाळ, विकास नेवडे, हेमा वाघमारे, रेखा गोरे, अनिता खरमाटे, सविता सोनवणे, प्रतिभा चाटे, कौशल्या ढाकणे आदींनी सहभाग घेतला.

जेलमधून बेल अन॒ पुन्हा धंदा

दरम्यान, मनिषा सानप ही अंगणवाडी सेविका म्हणून कार्यरत असतानाच ती जालन्यातील डॉ. सतीश गवारेला बोलावून गेवराईतील आपल्या घरी महिलांचे बेकायदा गर्भलिंग निदान व गर्भपात करत असे. दिड वर्षांपूर्वी तिच्यावर गुन्हा नोंद झाल्यनंतर महिला व बालकल्याण विभागाने तिच्यावर बडतर्फीची कारवाई केली. वर्षभर जेल भोगून परतल्यानंतर पुन्हा तिने हाच धंदा सुरु केला.

डॉक्टर कि गुंडा; पोलिसांशी झटापट

दरम्यान, डमी रुग्ण असलेली महिला पोलिस व एक पोलिस कर्मचारी या बेकायदा केंद्रावर पोचल्यानंतर अगोदरच मनिषा सानप व डॉ. सतीश गावरे एका महिलेची सोनोग्राफी करत होते. त्याला डमी आलेल्यांचा संशय आल्याने डॉ. गवारेने पळ काढला. त्याला अडविण्याचा प्रयत्न केल्याने त्याने पोलिसांशी केलेल्या झटापटीत पी. टी. चव्हाण व प्रतिभा चाटे जखमी झाले.

सोनोग्राफीसह गर्भपाताची औषधे व उपकरणेही

दरम्यान, या ठिकाणी मोबाईल सोनोग्राफी मशिनसह मिझोप्रोस या गोळ्या तसेच सिम्स स्पेक्युलम, युटेराईन क्युरेटर, स्पाँज होर्डींग्ज, फोर्सेप ही उपकरणेही या ठिकाणी आढळली आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com