जालना : चोवीस तासांमध्ये जिल्ह्यात ३६३ रुग्ण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

corona update
जालना : चोवीस तासांमध्ये जिल्ह्यात ३६३ रुग्ण

जालना : चोवीस तासांमध्ये जिल्ह्यात ३६३ रुग्ण

जालना : कोरोनाच्या(corona)तिसऱ्या लाटेत जिल्ह्यात संसर्ग वेगाने होत आहे. शनिवारी (ता.२२) जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्येने उच्चांक गाठला. जिल्ह्यात शनिवारी तब्बल ३६३ नवीन कोरोना रुग्ण आढळून आले. यामध्ये जालना(jalna) शहरातील २५७ रुग्ण आहेत. १०० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

हेही वाचा: जालना : जिल्हा बँकेकडून शंभर टक्के अनुदान वितरण

जिल्ह्यात कोरोनाची तिसरी लाट आता हळूहळू रुद्र रूप घेत असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढली आहे. मात्र, या तिसऱ्या लाटेत रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या कमी असल्याचे समाधानकारक चित्रही पाहण्यास मिळत आहे. शनिवारी जिल्ह्यात दोन हजार ३६८ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. यामध्ये जिल्ह्यात ३६३ नवीन कोरोना रुग्ण आढळून आले. यात एकट्या जालना शहरात २५७ कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.

तालुक्यातील नाव्हा येथे दोन, नंद्रागाव, सामनगाव, शेवगा, इंदेवाडी, काळेगव्हाण, मौजपुरी, गोरेगाव, परिपिंपळगाव, शेवली, वरेगाव येथे प्रत्येकी एक, परतूर शहरात दोन, घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथे दोन, देवीदहेगाव येथे एक, अंबड शहरात ११, तालुक्यातील दहेगाव येथे दोन, मसाई, पारनेर, दह्याळा, सोनक पिंपळगाव, शहापूर, जामखेड, धनुरई येथे प्रत्येकी एक, बदनापूर शहरात पाच, तालुक्यातील शेलगाव येथे १३, राजेवाडी येथे तीन, दावलवाडी, नजीक पांगरी येथे प्रत्येकी दोन, उज्जैनपुरी येथे एक, भोकरदन शहरात पाच, तालुक्यातील चांदई येथे तीन, फत्तेपूर, बोरगाव, आवना, वालसावंगी, मसनपूर व इतर एका गावात प्रत्येकी एक व इतर जिल्ह्यातील २३ जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

हेही वाचा: जालना : जिल्ह्यात अखेर ओमीक्रॉनचा पहिला रूग्ण आढळला

जिल्ह्यात आतापर्यंत ६४ हजार ३४४ कोरोनाबाधित आढळून आले आहेत. दरम्यान, शनिवारी १०० कोरोना रुग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त झाल्याने आतापर्यंत ६१ हजार ५९४ जण कोरोनावर मात केली आहे. परिणामी, जिल्ह्यात सध्या एक हजार ५४६ सक्रिय कोरोना रुग्णांवर उपचार असून, यातील एक हजार ४६४ जण होमक्वारंटाइमध्ये तर ३९ जण संस्थात्मक अलगीकरणात आहेत. तर ५२ रुग्ण रूग्णालयांमध्ये दाखल झाले आहेत. आतापर्यंत एक हजार २०४ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे.

  • एकूण बाधित:६४,३४४

  • एकूण मृत्यू: १,२०४

  • एकूण बरे झाले: ६१,५९४

  • सक्रिय रुग्ण :१,५४६

Web Title: 363 New Corona Patients In District

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top