VIDEO : मोबाईल टॉवरकडून मिळेल 40 कोटींचे उत्पन्न, AMC आयुक्तांचा दावा

माधव इतबारे
बुधवार, 18 डिसेंबर 2019

औरंगाबाद - शहरातील मोबाईल टॉवरपोटी महापालिकेला 40 ते 50 कोटी रुपयांचे उत्पन्न अपेक्षित असून, आतापर्यंत 157 टॉवर सील करण्यात आले आहेत. त्यात बड्या थकबाकीदार कंपन्यांना टार्गेट केले जात आहे, असे महापालिका आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी मंगळवारी (ता. 17) सांगितले. 

औरंगाबाद - शहरातील मोबाईल टॉवरपोटी महापालिकेला 40 ते 50 कोटी रुपयांचे उत्पन्न अपेक्षित असून, आतापर्यंत 157 टॉवर सील करण्यात आले आहेत. त्यात बड्या थकबाकीदार कंपन्यांना टार्गेट केले जात आहे, असे महापालिका आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी मंगळवारी (ता. 17) सांगितले. 

महापालिकेच्या आकडेवारीनुसार शहरात 595 मोबाईल टॉवर आहेत. यापैकी 534 मोबाईल टॉवर अनधिकृत आहेत. या टॉवरपोटी सुमारे 30 कोटी रुपये महापालिकेचा कर थकीत आहे. दरम्यान महापालिकेने बेकायदा टॉवरला दुप्पट कर लावला होता. याविरोधात काही कंपन्यांनी न्यायालयात धाव घेतली. या कंपन्यांचे टॉवर सील करण्यास न्यायालयाने मनाई केली.
त्याचा आधार घेत इतर कंपन्या देखील कर भरण्यास तयार नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे थकबाकीचा आकडा वाढतच आहे.

दरम्यान आस्तिककुमार पांडेय यांनी पदभार घेताच मोबाईल टॉवर कंपन्यांच्या प्रतिनिधींची बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी थकीत करासाठी शुक्रवारपासून (ता.13) मोबाईल टॉवर सील करण्याची मोहीम हाती घेतली. मात्र तांत्रिकदृष्ट्या ही कारवाई केली असती तर, अवघ्या दोन तासांत मोबाईलचे नेटवर्क डाऊन झाले असते. यासंदर्भात मंगळवारी आयुक्तांनी पत्रकारांना सांगितले, की महापालिकेने बड्या थकबाकीदार कंपन्यांच्या विरोधात मोहीम हाती घेतली आहे.

आतापर्यंत 157 टॉवर सील करण्यात आले असून, ही मोहीम सुरूच राहणार आहे. महापालिकेला टॉवरच्या करापोटी 40 ते 50 कोटी रुपयांचे उत्पन्न अपेक्षित आहे. गेल्या चार दिवसांत कारवाई सुरू झाल्यानंतर कंपन्यांनी एक कोटीपेक्षा जास्त कर भरला आहे. 

रेडिएशनची  होणार तपासणी 
महापालिकेची सध्याची मोहीम थकीत कर वसूल करण्यासाठीची आहे. त्यानंतर हे मोबाईल टॉवर नियमित झाल्यास त्यातून निघणारे रेडिएशन (घातक किरणे) यासह इतर आवश्‍यक तपासण्या केल्या जातील. नागरिकांमध्ये याविषयी जनजागृती केली जाईल, असेही आयुक्तांनी नमूद केले. 

हे माहिती हवेच : आजारपण आल्यावर नको धावाधाव : जाणून घ्या आरोग्य योजना

हेही वाचा : औरंगाबादचे झाले काश्‍मीर  

क्‍लिक करा : ऑनलाईन नोकरीच्या अमिषाने गंडा 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 40 crore will be generated from mobile tower