नांदेडला मानव विकासकडून ४५ लाख 

कृष्णा जोमेगावकर
बुधवार, 15 जानेवारी 2020

नांदेड : मानव विकास आयुक्तालयाकडून जिल्ह्याला ४५ लाख १६ हजारांचा निधी मंजूर झाला आहे. यातून जिल्ह्यातील ४२ महिला बचतगटांना शेळीपालनासाठी २२ लाख तर कस्तूरबा गांधी बालीका विद्यालयासह जिल्हा परिषदेच्या निवडक १७ शाळा डिजीटल करण्यासाठी २२ लाख खर्च होणार आहेत.

नांदेड : मानव विकास आयुक्तालयाकडून जिल्ह्याला ४५ लाख १६ हजारांचा निधी मंजूर झाला आहे. यातून जिल्ह्यातील ४२ महिला बचतगटांना शेळीपालनासाठी २२ लाख तर कस्तूरबा गांधी बालीका विद्यालयासह जिल्हा परिषदेच्या निवडक १७ शाळा डिजीटल करण्यासाठी २२ लाख खर्च होणार आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांची शिफारश
जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी जिल्ह्यातील महिला बचतगटातील महिलांना शेळीपालन उद्योगासाठी आवश्यक साहित्य देवून महिलांच्या दरडोइ उत्पन्नात वाढ करण्यासाठी निधीची मागणी केली होती. तसेच जिल्हा परिषदेच्या निवडक हायस्कुल व कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयात सुरु असलेल्या अभ्यासिका तंत्रज्ञानाने डिजीटल करण्यासाठी आवश्यक साहित्य पुरविण्याबाबत निधीची मागणी केली होती. या दोन्ही बाबींसाठी एकूण ४५ लाख १६ हजाराच्या अंदाजीत खर्चाच्या नियोजनास विभागीय आयुक्तांनी मानव विकास आयुक्तांकडे मान्यतेस शिफारश केली होती. या शिफारशीनुसार निधीस मंजुरी दिली आहे. 

हेही वाचलच पाहिजे....नांदेडमध्ये शेतकऱ्यांनी साखर सहसंचालक कार्यालय फोडले

महिला बचतगटांना शेळीपालनासाठी निधी 
मानव विकास आयुक्तांनी ४२ महिला बचतगटांना शेळीपालनासाठी २२ लाख २९ हजार रुपये मंजूर केले आहेत. यात किनवट तालुक्यातील ५४ महिला बचत गट, हिमायतनगर तालुक्यातील सहा बचत गट, उमरी तालुक्यातील २५ महिला बचत गट व देगलूर तालुक्यातील ४२ बचत गटांना हा निधी मिळणार आहे. 

हेही वाचा....नांदेडमध्ये स्वीकृत सदस्यांचा मुहूर्त कधी

शाळा डिजीटलसाठी निधी
कस्तूरबा गांधी बालीका विद्यालयासह जिल्हा परिषदेच्या निवडक १७ शाळा डिजीटल करण्यासाठी २२ लाख ८७ लाख मंजूर झाले आहेत. यात मुदखेड, लोहा, देगलूर, बिलोली, धर्माबाद, भोकर, हिमायतनगर, किनवट या तालुक्यातील प्रत्येकी दोन शाळा तर उमरी तालुक्यातील एका शाळेचा समावेश आहे.

नऊ तालुक्यासाठी वीस कोटींचा निधी
मानव विकास कार्यक्रमातंर्गत २०१९ - २० या वर्षासाठी जिल्ह्यातील समाविष्ठ असलेल्या मुदखेड, लोहा, देगलूर, बिलोली, धर्माबाद, भोकर, हिमायतनगर, किनवट व उमरी या नऊ तालुक्यासाठी एकूण २० कोटी ५८ लाख ३३ हजार रुपयांचा निधी उपलब्ध होणार आहे. या निधीच्या वीस टक्के म्हणजेच चार कोटी ११ लाख (प्रती तालुका ४५ लाख ७४ हजार) रुपयांच्या निधीला मान्यता देणे अनुज्ञेय आहे.

जिल्ह्यााला यापूर्वी १६ कोटी मंजूर
मानव विकास कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील नऊ तालुक्यात विविध विकासासाठी १५ कोटी ८५ लाखांचा मराठवाडा विकास मंडळाचा विशेष निधी नुकताच मंजूर झाला आहे. यात जिल्ह्यातील मानव विकास कार्यक्रातंर्गत किनवट, हिमायतनगर, भोकर, बिलोली, धर्माबाद, देगलुर, उमरी, मुदखेड व लोहा या तालुक्यात यातून विकास कामे होणार आहेत. हा निधी आरोग्य, शिक्षण, महिला बचतगट, कृषी प्रक्रीया आदी बांबीवर खर्च होणार आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 45 lakh fund from human development to Nanded