नांदेडमध्ये शेतकऱ्यांनी साखर सहसंचालक कार्यालय फोडले

NND15KJP02.jpg
NND15KJP02.jpg

नांदेड : परभणी जिल्ह्यातील महाराष्ट्र शुगर या खासगी कारखान्याने सहा वर्षापूर्वी शेतकऱ्यांचा ऊस गाळप करुनही पैसे दिले नाहीत. अनेकवेळा मागणी करुनही थकलेले करोडो रुपये मिळत नसल्याने बुधवारी (ता. १५) दिडशे ते दोनशे शेतकऱ्यांनी येथील प्रादेशीक सहसंचालक (साखर) कार्यालयावर आंदोलन केले. यावेळी शेतकऱ्यांनी कार्यालयाच्या काचा फोडून खुर्च्या फेकून दिल्या. यानंतर शिवाजीनगर ठाण्याच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. 

महाराष्ट्र शुगरकडे थकले उसाचे पैसे 
परभणी जिल्ह्यातील महाराष्ट्र शुगर या खासगी साखर कारखान्याने २०१४ - २०१५ मध्ये नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा ऊस गाळपासाठी नेला. परंतु गाळपानंतर शेतकऱ्यांना उसाचे पैसे दिले नाहीत. याबाबत शेतकऱ्यांनी राज्याच्या साखर आयुक्तांसह नांदेड येथील प्रादेशीक साखर सहसंचालक कार्यालयाकडे तक्रारी केल्या. यानंतर या कारखान्याची मालमत्ता जप्त करुन शेतकऱ्यांचे पैसे देण्याचे आदेश साखर आयुक्तांनी दिले होते.

अध्यक्षांवर पोलिसात गुन्हा
महाराष्ट्र शुगर कारखान्याच्या अध्यक्षांवर मुदखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्यावेळी न्यायालयाने पन्नास लाख भरल्यानंतर जामीन दिला होता. ही रक्कम नांदेड सहसंचालक कार्यालयाकडे जमा आहे. हा कारखाना लातूर जिल्ह्यातील एका बड्या राजकीय नेत्याच्या व्टेंटी-व्टेंटी या ग्रुपला शेतकऱ्यांच्या परस्पर विक्री केला. पंरतु त्यावेळीही शेतकऱ्यांचे थकीत पैसे दिले नसल्याचे निवेदनात म्हटले आहे. 

हेही वाचलेच पाहिजे ....अशोक चव्हाणांचा पतंग आकाशी

दिडशे ते दोनशे शेतकऱ्यांचा ठिय्या
याबाबत वेळोवेळी निवेदन देवुनही कारखान्याकडून पैसे मिळत नसल्याने बुधवारी (ता. १५) नांदेड जिल्ह्यातील दिडशे ते दोनशे शेतकऱ्यांसह परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी थकीत रक्कमेसाठी ऊसदर नियंत्रन मंडळाचे सदस्य तथा शिवसेनेचे प्रल्हाद इंगोले यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले. यावेळी शेतकऱ्यांनी पैसे लवकर देण्यात यावे, पैसे दिल्याशिवाय कारखान्याचा ताबा देवू नये, कारखान्याचा गाळप परवाना निलंबीत करुन प्रशासनाने ताबा घ्यावा, एनसीएलटीच्या विरोधात आयुक कार्यालयाने अपिल करावे, यंदाच्या हंगामात पूर्ण एफआरपी न देणाऱ्या कारखान्यावर व्याज आकारणी सुरु करावी, २०१४ - १५ चे विलंब व्याज आकारणीची माहिती न देणाऱ्या कारखान्यावर आरआरसी करावी, आदी मागण्या करण्यात आल्या. आंदोलनात वयोवृद्ध शेतकरी सहभागी झाले होते. 

काचा फोडून खर्चां फेकल्या
उसाचे पैसे देण्याची मागणी करत संतप्त शेतकऱ्यांनी साखर सहसंचालक कार्यालयासमोर बुधवारी आंदोलन केले. यावेळी कार्यालयाच्या काचा फोडण्यात आल्या. तसेच कार्यालयातील खुर्च्यांही फेकून रोष व्यक्त केला. यानंतर कार्यालयातील उपस्थित कर्मचाऱ्यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्याशी संपर्क केल्याने पोलिस बंदोबस्त लावण्यात आला. साखर कार्यालयाकडून तक्रार दिली नसल्याने या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला नाही. दरम्यान लेखी आश्वासनाशिवाय आंदोलन मागे घेण्यास नकार देत शेतकऱ्यांचा सायंकाळी उशीरापर्यंत कार्यालयात ठिय्या सुरुच होता.     


यंदा राज्यातील सर्व साखर कारखान्यांनी हंगाम संपण्यापुर्वी ९९.५ टक्के एफआरपी दिली आहे. तसेच महाराष्ट्र शुगरकडे शेतकऱ्यांनी थकलेल्या रक्कमेची मागणी करणे चुकीचे नाही. पण हा खासगी कारखाना दिवाळखोरी (एनसीएलटी) कायद्यातंर्गत विक्री झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांना याबाबत कायदेशी मार्गाने लढा द्यावा लागेल.
शेखर गायकवाड
राज्य साखर आयुक्त, पूणे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com