औरंगाबादजवळ बस-कारच्या अपघातात पाचजण गंभीर जखमी

शेख मुनाफ
शनिवार, 27 जुलै 2019

एसटी बस व कारच्या समोरासमोर झालेल्या अपघातात पाच जण गंभीर जखमी झाले. ही घटना औरंगाबाद-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील आडुळ (ता. पैठण, जि.औरंगाबाद) शिवारात शनिवारी (ता. 27) सकाळी आठच्या सुमारास घडली.

आडुळ : एसटी बस व कारच्या समोरासमोर झालेल्या अपघातात पाच जण गंभीर जखमी झाले. ही घटना औरंगाबाद-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील आडुळ (ता. पैठण, जि.औरंगाबाद) शिवारात शनिवारी (ता. 27) सकाळी आठच्या सुमारास घडली. कारमधील जखमींना येथील 108 रुग्णवाहिकेतून पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथे पाठविण्यात आले.

अंबड आगाराची औरंगाबाद-अंबड ही बस (एमएच 20 बीएल 2869) औरंगाबादहुन आडुळमार्गे अंबडला जात असतांना आडुळ फाटा येथुन आडुळकडे गावात वळण घेत असताना अंबडहुन औरंगाबादकडे जाणार्या कारला (एमएच 21 एएक्स 9797) धडक दिली. यात कारमधील रमेश भोरे (वय 28), ज्योती शिकरी (वय 30), शुभांगी भोरे (वय 25), रमेश गायकवाड (वय 40 ) व आणखीन एक जण नाव समजु शकले नाही असे पाच जण, तर बसमधील गायञी तोर (वय 14, रा. घनसावंगी, जि. जालना), मखमलबाई जाधव (वय 65) व इतर तीन जण किरकोळ जखमी झाली असून  त्यांची नावे कळू शकली नाही.

अपघात होताच आडुळ येथील 108 रुग्णवाहिकेचे डॉ. सय्यद अस्लम, सय्यद नासेर, तात्याराव वाघ यांनी जखमींना पुढील उपचारासाठी औरंगाद येथे हलविले. या अपघाताची नोंद पाचोड पोलिस ठाण्यात घेण्यात आली असुन पुढील तपास ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक अतुल येरमे यांच्या मार्गदर्शनाखाली बिट जमादार कल्याण राठोड, फेरोज बरडे हे करीत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 5 injured in accident near Aurangabad between car and ST