Latur : मद्यपींवर राहणार पोलिसांचा वॉच

लातूर जिल्ह्यात `थर्टी फर्स्ट` ला ५०० पोलिस राहणार रस्त्यावर
police
policelatur

लातूर : या वर्षीचा अखेर अवघ्या तीन दिवसावर आला आहे. थर्टी फस्टला अनेक जण पार्टी करतात, जल्लोष करतात. यात तरुणांचा सहभाग लक्षणीय असतो. पण पार्ट्यामुळे रंगाचा बेरंगही होण्यास काही वेळ लागत नाही. मद्यपींमुळे अनेक घटना घडतात. हे लक्षात घेवून मद्य घेवून रस्त्यावर येणाऱ्यावर पोलिसांचा वॉच असणार आहे. या करिता जिल्ह्यात पाचशेपेक्षा अधिक पोलिस अधिकारी व कर्मचारी रस्त्यावर असणार आहेत. या पैकी २५० पोलिस हे एकट्या लातूर शहरात असणार आहेत. त्यामुळे थर्टी फस्टची सर्वत्र तयारी सुरु असतानाच पोलिस यंत्रणा देखील सज्ज झाली आहे.

जिल्ह्यात दरवर्षी ठिकठिकाणी थर्टी फस्ट मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या वर्षी येत्या रविवारी (३१ डिसेंबर) थर्टी फस्ट आहे. त्यामुळे सु्ट्टीचा दिवस आला आहे. ठिकठिकाणी पार्ट्यांचे नियोजन केले जात आहे. रिसॉर्ट, बार, हॉटेल चालकांनी देखील तयारी सुरु केली आहे. या निमित्ताने हॉटेलवर आकर्षक विद्युत रोषणाईही केली जाते.

त्याची तयारी देखील सुरु झाली आहे. थर्टी फस्टला मद्य घेणाऱ्यांची संख्या लक्षणीय असते. मद्य घेवून रस्त्यावर येवून आरडाओरडा करणे, वेडेवाकडे वाहन चालवण्याचे प्रकार सातत्याने घडत असतात. त्यामुळे यावर पोलिसांचे लक्ष असणार आहे. पोलिस अधिक्षक सोमय मुंडे यांनी आतापासून सज्ज राहण्याचे आदेश पोलिस यंत्रणेला दिले आहेत.

police
Latur News : चिंचांनी येणार आर्थिक स्‍थैर्य

नवीन वर्षाचे स्वागत तसेच थर्टी फस्ट शांततेत साजरा झाला पाहिजे, या करीता पोलिस यंत्रणा सज्ज आहे. जिल्ह्यात पाचशे पोलिस रस्त्यावर असणार आहेत. या पैकी २५० पोलिस हे लातूर शहरात असतील. रात्री ड्रंक अॅण्ड ड्राईव्हच्या केसेस केल्या जाणार आहेत. सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या पार्ट्यावर जास्त लक्ष असेल. मिनी पथक कार्यरत असणार आहे. चौका - चौकामध्ये तपासणी केली जाणार आहे. ड्रंक अॅण्ड ड्राईव्हचे गुन्हे दाखल करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

- सोमय मुंडे, पोलिस अधिक्षक, लातूर

रविवारपासूनच पोलिस बंदोबस्त

रविवारी दुपारपासूनच तगडा पोलिस बंदोबस्त असणार आहे. जिल्हाभरात पाचशे पोलिस अधिकारी व कर्मचारी रस्त्यावर राहणार आहेत. या पैकी २५० पोलिस अधिकारी व कर्मचारी हे लातूर शहरात असणार आहेत. रात्री उशिरा रस्त्यावर फिरणाऱ्यांची तपासणी केली जाणार आहे. यात गुन्हे दाखल करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com