बीड जिल्ह्यात टेंपोसह ५० लाखांचा गुटखा पकडला, अवैध दारूचे दोन दिवसांत ५१ गुन्हे

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 16 April 2020

बीड जिल्ह्यात अवैध दारू विक्रेत्यांचा सुळसुळाट सुरू असून, दोन दिवसांत याप्रकरणी ५१ गुन्हे नोंद करून तीन लाखांहून अधिक रुपयांची हातभट्टी नष्ट करण्यात आली. महापुरुषांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्वच २८ ठाण्यांतर्गत अवैध दारूविक्रेत्यांवर कारवायांचे निर्देश होते.

बीड - संचारबंदी व लॉकडाउनमध्येही गुटख्याची तस्करी आणि अवैध दारू विक्री व निर्मिती सुरूच आहे. दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेने संचारबंदीत गुटख्याची तस्करी करणारा टेंपो पकडून टेंपोसह गुटखा असा ५० लाखांचा ऐवज पकडला. तर पोलिसांनी दोन दिवसांत दारूचे ५१ गुन्हे नोंद करून तीन लाखांवर दारू नष्ट केली. 

मांजरसुंबामार्गे टेंपोतून (केए- ३२, डी- ४४९४) गुटखा येत असल्याची माहिती मिळाल्यावरून गुन्हे शाखेचे सहायक निरीक्षक आनंद कांगुणे यांनी सापळा लावला. टेंपोच्या मागील बाजूला दोन लाख ७५ हजार किमतीचे तांदळाचे १७२ कट्टे होते. मात्र, तांदळाच्या आडून २९ लाख ४० हजार किमतीच्या गुटख्याची तस्करी केली जात असल्याचे उघड झाले. मुद्देमालासह टेंपो बीड ग्रामीण पोलिसांच्या स्वाधीन केला.

यासोबतच बीड ग्रामीण हद्दीत दोन व पेठबीड हद्दीत एका ठिकाणी छापा टाकून अवैध दारूही जप्त केली. गुन्हे शाखा निरीक्षक भारत राऊत, सहायक निरीक्षक आनंद कांगुणे, बाळासाहेब आघाव, उपनिरीक्षक संतोष जोंधळे, गोविंद एकीलगावे व कर्मचाऱ्यांनी या कारवाया केल्या. 

पळून गेलेल्या मजुरांच्या कुटुंबीयांना पोलिसांनी...

जिल्ह्यात अवैध दारू विक्रेत्यांचा सुळसुळाट सुरू असून, दोन दिवसांत याप्रकरणी ५१ गुन्हे नोंद करून तीन लाखांहून अधिक रुपयांची हातभट्टी नष्ट करण्यात आली. महापुरुषांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्वच २८ ठाण्यांतर्गत अवैध दारूविक्रेत्यांवर कारवायांचे निर्देश होते. त्यानुसार १३ एप्रिल रोजी ११ ठिकाणी छापे टाकून ६० हजार ७९८ रुपयांची गावठी दारू हस्तगत करण्यात आली.

याप्रकरणी ११ गुन्हे नोंद केले आहेत. १४ एप्रिल रोजीही अवैध दारूविक्रीविरोधात मोहीम राबविली. दिवसभरात ४० गुन्हे नोंद करून सुमारे दोन लाख ५६ हजार २८२ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. दोन दिवसांत मिळून सुमारे ५१ गुन्हे नोंद केले असून, तीन लाख १७ हजार ९० रुपयांची हातभट्टी नष्ट करण्यात आली. 

बाबासाहेबांचे क्रांतिकारी विचार उर्दूतून

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 51 crimes in two days of illicit liquor

Tags
टॉपिकस
Topic Tags: