बीड जिल्ह्यात शेतकऱ्याने घेतली फाशी, भाजपच्या राणा डोईफोडे सह चौघांवर गुन्हा दाखल 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 7 July 2020

किसनराव डोईफोडे यांना सर्जेराव डोईफोडे व त्यांच्या कुटुंबाकडून सततचा त्रास जीवे मारण्याच्या धमक्या धमक्या दिल्या जात होत्या. या त्रासाला कंटाळून किसन धोंडीबा डोईफोडे वय ५२ वर्ष यांनी घराच्या पाठीमागे लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन जीवन यात्रा संपवली. 

नेकनूर (बीड) : शेतातील वादामुळे नेहमीच्या त्रासाला कंटाळून किसन धोंडीबा डोईफोडे वय ५२ या शेतकऱ्याने मंगळवारी फाशी घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. याप्रकरणी भाजपचे राणा डोईफोडे कुटुंबातील चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धक्कादायक..! औरंगाबाद प्राणिसंग्रहालयात तब्बल पाच वाघांचा मृत्यू, वाचा सविस्तर..! 
याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, सर्जेराव धोंडीबा डोईफोडे व किसन धोंडीबा डोईफोडे यांच्यामध्ये शेतीचा वाद होता. सोमवारी त्यांच्यामध्ये वाद झाले होते. त्यानंतर याबाबतची तक्रार ही नेकनूर पोलीस स्टेशनला दाखल होऊन गुन्हे दाखल झाले होते. किसन धोंडीबा डोईफोडे हे आपल्या वडिलोपार्जित शेतातील वाटणी बाबतीत व सामायिक बोर यासंबंधी किसनराव व सर्जेराव यांच्यामध्ये वाद होता. या प्रकरणी किसनराव डोईफोडे यांना सर्जेराव डोईफोडे व त्यांच्या कुटुंबाकडून सततचा त्रास जीवे मारण्याच्या धमक्या धमक्या दिल्या जात होत्या. या त्रासाला कंटाळून किसन धोंडीबा डोईफोडे वय ५२ वर्ष यांनी घराच्या पाठीमागे लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन जीवन यात्रा संपवली. 

सावंगीत कब्रस्तानाच्या कडेला आढळली शिवपिंड; गावकऱ्यांनी हा घेतला निर्णय..!  

याप्रकरणी प्रदीप किसनराव डोईफोडे यांच्या फिर्यादीवरून सर्जेराव धोंडीबा डोईफोडे, राणा सर्जेराव डोईफोडे, कालिंदा सर्जेराव डोईफोडे, शितल सर्जेराव डोईफोडे व मनोज सर्जेराव डोईफोडे यांच्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर १४०/ २०२० कलम ३०६, ३२३, ५०४ ,५०६ व ३४ भा.द.वी. नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  ही घटना घडल्यानंतर आरोपींना तात्काळ अटक करावे.

घरातल्या घरात तपासणीकडे वाढला कल, आरोग्याबाबत लातूरकर जागरूक   

खुनाचा गुन्हा दाखल दाखल करावा या मागणीवर मयताचे नातेवाईक अडुन बसले होते. व त्यांनी शवविच्छेदनासाठी नकार दिला होता. यावेळी डोईफोडवाडी मध्ये काही वेळ तणाव निर्माण झाला होता. स.पो.नि. लक्ष्‍मण केंद्रे यांनी योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर मयतावर नेकनुर स्त्री व कुटीर रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. या प्रकरणाचा पुढील तपास नेकनूर पोलिस करत आहेत.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 52 year old farmer ended his life by hanging