मोबाईल शॉपीचे शटर उचकटले, 55 हजारांच्या साहित्याची चोरी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 सप्टेंबर 2019

बिडकीन (ता. पैठण) येथील पैठण रस्त्यावरील विराज मोबाईल शॉपीचे शटर उचकटून मोबाईल व इतर साहित्य असा 55 हजार 413 रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केल्याची घटना सोमवारी (ता. 16) उघडकीस आली. बिडकीनमध्ये पहाटे 12 ते तीन वाजेपर्यंत पाच ते सहा ठिकाणी चोरट्यांनी चोरी करण्याचा प्रयत्न केला असून चार ते पाच चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले आहेत.

बिडकीन (जि.औरंगाबाद) : बिडकीन (ता. पैठण) येथील पैठण रस्त्यावरील विराज मोबाईल शॉपीचे शटर उचकटून मोबाईल व इतर साहित्य असा 55 हजार 413 रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केल्याची घटना सोमवारी (ता. 16) उघडकीस आली. बिडकीनमध्ये पहाटे 12 ते तीन वाजेपर्यंत पाच ते सहा ठिकाणी चोरट्यांनी चोरी करण्याचा प्रयत्न केला असून चार ते पाच चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले आहेत.

बिडकीन पोलिसांनी फुटेजच्या आधारे चोरट्यांचे शोधकार्य सुरू केले आहे. गावात बंद दुकाने व घरे फोडण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला असून एकावेळी अनेक ठिकाणी चोरी करण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रात्री ग्रामसंरक्षण दलाने जागे राहून पोलिसांसोबत गस्त घालण्याची मागणी बिडकीन येथील नागरिकांनी केली आहे. विराज मोबाईल शॉपीचे मालक प्रदीप कडुबाळ फासाटे हे रविवारी (ता. 15) रात्री साडेनऊला दुकानाला कुलूप लावून घरी गेले.

दुसऱ्या दिवशी सोमवारी (ता. 16) सकाळी शेजारील दुकानदाराला शटर उचकटून चोरी झाल्याचे लक्षात येताच त्यांनी प्रदीप फासाटे यांना फोन करून सांगितले व ते दुकानावर आले असता त्यांना दुकानातील मोबाईल व काही साहित्य असा एकूण 55 हजार 413 रुपयांचा ऐवज चोरी झाल्याची फिर्याद त्यांनी बिडकीन पोलिस ठाण्यात दिली असून सहायक पोलिस निरीक्षक राजेंद्र बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक लक्ष्मण कीर्तने पुढील तपास करीत आहेत.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 55 Thousand Accessories Stolen