
राष्ट्रवादीच्या रक्तदान शिबिरात ५७ रक्तदात्यांनी केले रक्तदान
उमरगा (उस्मानाबाद): राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते शरदचंद्र पवार व प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसच्या आवाहनानुसार कोरोना काळात देशात झालेला रक्त तुटवडा भरून काढण्यासाठी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस व राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने सोमवारी (ता. तीन) श्रीराम मंगल कार्यालयात आयोजित रक्तदान शिबीरात ५७ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
शिबिराचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रा. सुरेश बिराजदार यांच्या हस्ते झाले. रक्तदान शिबिराच्या नियोजनात अण्णाभाऊ साठे क्रांती बहुउद्देशीय सामाजिक संस्था ब्रह्मपुरी, विश्व मराठा संघाचे जिल्हा संपर्कप्रमुख बाबा पवार व त्यांचे सहकारी यांचेही योगदान लाभले. दरम्यान कोरोना महामारीच्या काळात व कोविड प्रतिबंधात्मक लस घेतल्यानंतर अनेकांना रक्तदान करता येणार नाही. याची जाणीव ठेवून लस घेण्यापूर्वी प्रत्येकाने रक्तदान करण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रा. बिराजदार यांनी यावेळी केले.
हेही वाचा: चिंताजनक! उमरग्यात महिनाभरात दीड हजारांहून अधिक कोरोना रुग्ण
या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष संजय पवार, राष्ट्रवादी युवक अध्यक्ष शमशोद्दीन जमादार, राष्ट्रवादी युवक जिल्हा उपाध्यक्ष मोहन जाधव, शहराध्यक्ष खाजा मुजावर (उमरगा), प्रा. दत्ता इंगळे (मुरूम), ग्रंथालय विभागाचे जगदीश सुरवसे, अभिजीत माडीवाले, अॅड. माळी, विष्णू भगत, रणजीत गायकवाड, बाळासाहेब बुंदगे, कुमार थिटे, व्यंकटेश खंडागळे, अजित पाटील, बाबा कुरेशी, भरत देडे, पिंटू कलशेट्टी, विकास गायकवाड, राहुल थोरात, रमेश बिराजदार, अमोल बिराजदार, किसन कांबळे, विश्व मराठा संघाचे शहर प्रमुख मंगेश भोसले, श्याम जोजन, रणजीत बिराजदार, आकाश राठोड, सुरज भोसले, राहुल मातोळे, दयानंद चव्हाण, प्रवीण माळी, प्रदीप चिंतामणी, विशाल मुगळे, आकाश अंधारे, नितीन नागरे, भीमाशंकर टिकांबरे आदींची उपस्थिती होती.
Web Title: 57 Blood Donors Donated Blood In Ncp Blood Donation Camp In
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..