Aundha Panchayat Samitisakal
मराठवाडा
Aundha Panchayat Samiti: औंढा पंचायत समितीत ५७ लाखांचा अपहार; चार कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस
Hingoli Fraud: औंढा पंचायत समितीत तब्बल ५७ लाख रुपयांचा अपहार उघडकीस आला आहे. चौघा कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून चौकशी सुरू आहे.
हिंगोली : औंढा नागनाथ पंचायत समितीच्या लेखा विभागात कपातीच्या रकमांमध्ये झालेल्या ५७ लाख रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणात चार कर्मचाऱ्यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्यात आली आहे. त्यात याबाबत तातडीने खुलासा करण्याचे आदेश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अंजली रमेश यांनी दिले.