esakal | Coronavirus : बीड जिल्ह्याची रुग्णसंख्या द्विशतकाच्या घरात
sakal

बोलून बातमी शोधा

6 new cases of COVID-19 in Beed District

गुरुवारी सहा नवे रुग्ण; २५२ जण झाले बरे 

Coronavirus : बीड जिल्ह्याची रुग्णसंख्या द्विशतकाच्या घरात

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बीड : जिल्ह्यात कोरोनाचे मीटर सुरूच असून, गुरुवारी (ता. नऊ) बीड, परळी व अंबाजोगाईत सहा रुग्ण आढळले. नव्या रुग्णांसह जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा १९९ झाला. सध्या ६९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत सातजणांचा कोरोना आणि इतर आजाराने मृत्यू झाला आहे. 

जिल्हा रुग्णालय, अंबाजोगाईचे स्वाराती वैद्यकीय महाविद्यालय, परळी, गेवराई व केजचे उपजिल्हा रुग्णालये, माजलगाव व आष्टीचे ग्रामीण रुग्णालये; तसेच अंबाजोगाई व बीडच्या कोविड केअर सेंटरमधून २५८ व्यक्तींचे थ्रोट स्वॅब गुरुवारी घेतले. याची तपासणी अंबाजोगाईच्या विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेत झाली. यातील २५२ स्वॅबचे अहवाल निगेटिव्ह तर सहा स्वॅबचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आढळले.

बीड, परळी, अंबाजोगाई, धारूर व गेवराई तालुक्यांतील उमापूर ठिकाणी हे रुग्ण आढळले आहेत. दरम्यान, आतापर्यंत कोरोनाबाधितांची संख्या १९९ झाली असून, यामध्ये जिल्ह्यात आढळलेल्या बाहेर जिल्ह्यातील रुग्णांसह जिल्ह्यातील बाहेर निदान झालेल्या रुग्णांचाही समावेश आहे.

घरातल्या घरात तपासणीकडे वाढला कल, आरोग्याबाबत लातूरकर जागरूक  

आतापर्यंत जिल्ह्यात आणि बाहेर असे सात लोकांचे कोरोनामुळे मृत्यू झाले आहेत. तर, सध्या जिल्ह्यातील विविध रुग्णालयांसह पुणे, मुंबई, नगर, औरंगाबाद आदी ठिकाणी ६९ कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत १२३ लोकांवर यशस्वी उपचार करून त्यांना कोरोनामुक्त करण्यात आले. 

ही पक्षिणी होते ‘होम क्वारंटाइन’ कशासाठी वाचा...!  
 
मृत्यू झालेल्या दोघांचे अहवाल निगेटिव्ह 
जिल्हा रुग्णालयातील अलगीकरण कक्षातील बीड व गेवराई येथील दोघांचा गुरुवारी मृत्यू झाला. तत्पूर्वी त्यांचे थ्रोट स्वॅब घेतले होते. दोघांचेही अहवाल निगेटिव्ह आले. 


 
परळीत बॅंक कर्मचाऱ्याला बाधा 
गुरुवारी परळीत पुन्हा एसबीआयच्या मोंढा शाखेतील एक कर्मचारी कोरोनाग्रस्त आढळला. अंबाजोगाईतील दोघांपैकी एक सातपुते गल्लीतील रुग्णाच्या सहवासातील आहे. दुसरा देशपांडे गल्लीतील असून, त्याचा फिरस्ता व्यवसाय आहे. धारूर येथील रुग्णही अशोकनगर भागातील कोरोनाग्रस्ताच्या सहवासातील आहे. उमापूर व बीडच्या काळेगल्लीतही एक रुग्ण आढळला. 
 
                                                                (संपादन : विकास देशमुख)