चाकूचा धाक दाखवून 60 हजार लुटले

जमील पठाण
शनिवार, 18 मे 2019

कायगाव :  औरंगाबाद-पुणे  महामार्गावरील नवीन कायगाव (ता.गंगापूर, जि.औरंगाबाद) परिसरात पुणेकडून यवतमाळला जाणाऱ्या कारला आडवून चाकूचा धाक दाखवून 60 हजारच्या वर ऐवज लुटल्याची घटना शनिवारी (ता.18) पहाटे एकनंतर घडली.

कायगाव :  औरंगाबाद-पुणे  महामार्गावरील नवीन कायगाव (ता.गंगापूर, जि.औरंगाबाद) परिसरात पुणेकडून यवतमाळला जाणाऱ्या कारला आडवून चाकूचा धाक दाखवून 60 हजारच्या वर ऐवज लुटल्याची घटना शनिवारी (ता.18) पहाटे एकनंतर घडली.

याबाबत गुन्हे पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, औरंगाबाद पुणे राष्ट्रीय महामार्गा वरील नवीन कायगावलगत उंबरकर यांच्या वस्ती जवळ पुण्याहुन यवतमाळ येथे कारने  जाणाऱ्या पती, पत्नीला अज्ञात दरोडेखोरांनी  स्विफ्ट डिझाईनर कार आडवी लावून थांबविले.त्यां प्रवाशी दाम्पत्याना चार ते सहा जणांनी चाकूचा धाक दाखवून, अंगठी, मनिमंगळसूत्र, रोख पैसे व इतर साहित्य मिळून अंदाजे 60 हजारच्या वर रोकड घेऊन पसार झाले.

ही घटना शनिवारी पहाटे एक वाजून पंधरा मिनिटांनी घडल्याची माहिती अल्टो कार चालकाने पोलिसांना दिली.लगेच घटनास्थळी ,औरंगाबाद एलसीबीचे पोलीस, गंगापूर पोलीस ठाण्याचे पोलीस पोहोचले.त्यांनी औरंगाबाद नगर रोड वरील लिंबेजलगाव,आणि खडकाफाटा या दोन ठिकाणच्या टोल नाक्यावर नाका बंदी केली.मात्र चोरटे पसार होण्यात यशस्वी झाले.चोरांच्या शोधात औरंगाबाद एलसीबीचे दोन पथक हायवे रोडवर गस्त घालत आहे.या घटनेचा गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 60 thousand stoles in Kaygaon