esakal | Gram Panchayat Election: उदगीरमध्ये 61 ग्रामपंचायतीसाठी 1205 उमेदवार निवडणूक रिंगणात
sakal

बोलून बातमी शोधा

gram panchayat

1205 उमेदवारात निवडणूक होणार असल्याची माहिती निवडणूक नायब तहसीलदार संतोष गुट्टे यांनी दिली आहे.

Gram Panchayat Election: उदगीरमध्ये 61 ग्रामपंचायतीसाठी 1205 उमेदवार निवडणूक रिंगणात

sakal_logo
By
युवराज धोतरे

उदगीर (जि.लातूर) : तालुक्यातील 61 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज परत घेण्याच्या शेवटच्या दिवशी सोमवारी (ता.4) 325 उमेदवारांनी माघार घेतली. त्यामुळे 1205 उमेदवारात निवडणूक होणार असल्याची माहिती निवडणूक नायब तहसीलदार संतोष गुट्टे यांनी दिली आहे.

या निवडणुकीत सहभागी असलेल्या वाढवणा बु (19), आडोळवाडी (6}, अरसनाळ (7), इस्मालपुर (1}, एकुरका रोड (9},  करडखेल (3}, करवंदी (2},  कासराळ (12}, करखेली (3}, वाढवणा खू (30},  गुरदाळ (4},  , जानापूर (1},  कुमदाळ (हेर) 8, कुमठा (4},  कौळखेड (14}, गंगापूर (1},  गुडसुर (3},  अवलकोंडा (3}, लोणी (17},  कुमदाळ {उदगीर} 1, चांदेगाव (4},  डाऊळ (1},  डोंगरशेळकी {6),  दावणगाव (5}, धोंडीहिप्पर्गा (9},  लिमगाव (14}, नळगीर (12},  कोदळी (2}, निडेबन (22},  पिंपरी (3}, सुमठाणा (4}, बामणी (5}, हकनकवाडी (2}, बेलसकरगा (7), बोरगाव (17}, भाकसखेडा (1},  मल्लापुर (8}, मांजरी (2}, मादलापुर (6}, माळेवाडी (3}, येणकी (19}, वागदरी (3},  लोहारा (3}, शेल्हाळ (2},  हिप्परगा (16}, हंगरगा (9}, हंडरगुळी (19}, हाळी (3}, रुद्रवाडी (6},  हेर (11},  होनीहिप्परगा {6) अशा एकूण  उमेदवारांनी आपले नामनिर्देशनपत्र माघार घेतले आहेत.

दहा ग्रामपंचायती बिनविरोध; राजकारणाचे केंद्र असलेली मुळज ग्रामपंचायत बिनविरोध

सोमवारी नामनिर्देशन पत्र दाखल केलेल्या उमेदवारांनी माघार घेऊन शिल्लक राहिलेल्या उमेदवारांना तहसीलदार रामेश्वर गोरे नायब तहसीलदारप्रज्ञा कांबळे यांच्या उपस्थितीत संबंधित गावच्या निवडणूक निर्णय अधिकारी यांनी निवडणूक चिन्हांचे वाटप केले. तालुक्यातील वाढवणा, निडेबन, हेर, लोहारा, हाळी, हंडरगुळी, डोंगरशेळकी, दावणगाव, कुमठा, कौळखेड, नाळगीर, येणकी या गावच्या निवडणुका रंगतदार व प्रतिष्ठेच्या होणार आहेत.

अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला-
ग्रामपंचायतीच्या पहिल्या टप्प्यात होत असलेल्या 61 गावच्या निवडणुकीत तालुका स्तरावरील अनेक दिग्गज नेत्यांच्या गावात निवडणुका होत आहेत. यात भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार गोविंदराव केंद्रे, जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे (कुमठा), काँग्रेसचे तालुकाध्यक्ष, बाजार समितीचे संचालक कल्याण पाटील (हाळी), भाजपाचे प्रदेश सचिव नागनाथ निडवदे, बाजार समितीचे संचालक पद्माकर उगिले, माजी सरपंच धर्मपाल नादरगे, (नळगीर),  माजी पंचायत समिती सभापती सत्यकला गंभीरे (करवंदी), पंचायत समितीचे सभापती तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रा शिवाजी मुळे, धनाजी मुळे  (दावणगाव), माजी उपसभापती रामदास बेंबडे, रोहिदास कुंडगीर (इस्मालपुर), पंचायत समितीचे उपसभापती बाळासाहेब मरलापल्ले (डोगरशेळकी) यांच्यासह अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

परभणी : कुटुंब नियोजनात पुरुष पिछाडीवर, वर्षभरात दोन पुरुषांची तर २१६ महिलांची नसबंदी

सहा गावे बिनविरोध-
या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी एकसष्ठ पैकी सहा गावे बिनविरोध निघाले आहेत. जकनाळ, टाकळी, धडकनाळ, क्षेत्रफळ, डागेवाडी व रुद्रवाडी या गावच्या निवडणूकीसाठी जेवढ्या जागा तेवढेच नामनिर्देशनपत्र दाखल झाल्याने ती निवडणूक घेण्याची आवश्यकता राहिली नाही. त्यामुळे ही गावे बिनविरोध निघाली असल्याची माहिती तहसीलदार रामेश्वर गोरे यांनी दिली आहे.

(edited by- pramod sarawale)

loading image