दहा ग्रामपंचायती बिनविरोध; राजकारणाचे केंद्र असलेली मुळज ग्रामपंचायत बिनविरोध

अविनाश काळे
Tuesday, 5 January 2021

तालुक्यातील 49 ग्रामपंचायतीच्या निवडणूकीतील 453 जागेसाठी एक हजार 242 नामनिर्देशनपत्र पात्र ठरले होते

उमरगा (जि.उस्मानाबाद) : जिल्हा व तालुक्याच्या राजकारणाचे केंद्र असलेली मुळजची ग्रामपंचायत प्रमुख नेतेमंडळी आणि ग्रामस्थांच्या एकोप्यामुळे बिनविरोध काढण्यात आली. मागील दोन टर्म पंचवार्षिक निवडणूकीत रंगत वाढवणारी ग्रामपंचायत निवडणूक यंदा बिनविरोध निघाल्याने एकमेकांतील कटुता दूर होऊन सांमजस्यता निर्माण झाली आणि एक चांगला संदेश दिला गेला आहे.

तालुक्यातील 49 ग्रामपंचायतीच्या निवडणूकीतील 453 जागेसाठी एक हजार 242 नामनिर्देशनपत्र पात्र ठरले होते. सोमवारी नामनिर्देशनपत्र माघार घेण्यासाठी गर्दी झाली होती. मुळजची ग्रामपंचायत काढण्यासाठी चालुक्य - पाटील यांची दिलजमाई झाली होती, त्या दृष्टीने गेल्या तीन दिवसापासून चर्चा, बैठका सुरू होत्या.

परभणी : कुटुंब नियोजनात पुरुष पिछाडीवर, वर्षभरात दोन पुरुषांची तर २१६ महिलांची नसबंदी

जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष केशव उर्फ बाबा पाटील, जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती अॅड. अभयराजे चालुक्य, भाजपाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य संताजी चालुक्य, हर्षवर्धन चालुक्य, काँग्रेसचे अर्जुन बिराजदार यांच्यासह गावातील प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत समन्वयातून ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध काढण्यात आली.

दरम्यान पंधरा जागेसाठी एकूण 78 नामनिर्देशनपत्र दाखल होते, सोमवारी 63 जणांनी माघार घेतले. त्यानंतर प्रमुख नेतेमंडळी, उमेदवार व कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. या वेळी भाजपाचे जिल्हा सरचिटणीस माधव पवार, माजी सरपंच लक्ष्मण दंडगुले, सुधाकर जाधव, मोहित चालुक्य, धनंजय जाधव, अतुल चव्हाण, आप्पा वडदरे, राहुल बिराजदार, रविंद्र जेवळे, गोरख चव्हाण, सतीश कांबळे, संतोष चव्हाण, व्यंकट शिंदे, शंकर कांबळे, शिवाजी निंबाळकर आदींची उपस्थिती होती.

हेही वाचा - परभणी : महिलांना आर्थिक स्वातंत्र्याचे दारे उघडणाऱ्या सावित्रीच्या खऱ्या लेकी

नवनियूक्त सदस्य पुढीलप्रमाणे : श्रीमंत चव्हाण, सुनिता वडदरे, बाबु दुधभाते, संध्या घोटणे, मोहित चालुक्य, राजश्री माळी, रेखा दंडगुले, कविता राठोड, किरण कांबळे, अमोल अंबुलगे, राम जमादार, मंदाकिनी चव्हाण, आशा सुर्यवंशी, शिवकन्या शिंदे, प्रवीण पाटील.

दहा ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध-
तालुक्यातील मुळजसह भिकार सांगवी, जकेकूर, जकेकूरवाडी, एकोंडी (जहागीर), कोळसूर (गुंजोटी), पळसगांव, चिंचकोटा, मातोळा, बाबळसूर ग्रामपंचायत बिनविरोध आल्या आहेत. शेवटच्या क्षणी तलमोड ग्रामपंचायत बिनविराध काढण्याचे प्रयत्न सुरू होते.

(edited by- pramod sarawale)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: gram panchayat election umarga mulaj political news