बीड जिल्ह्यात ६४ ग्रामपंचायतींना इमारती

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 जुलै 2018

बीड - एक हजारपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या राज्यातील ३०२ गावांमध्ये ग्रामविकास खात्यामार्फत बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजना ग्रामपंचायत कार्यालयाची नवीन इमारत बांधकामांना मंजुरी देण्यात आली आहे. याअंतर्गत जिल्ह्यात ६४ ग्रामपंचायतींची बांधकामे होणार आहेत.

बांधकामासाठी बारा लाख रुपयांचा निधी मिळणार असून यातील नव्वद टक्के रक्कम ग्रामविकास विभाग, तर दहा टक्के रक्कम ग्रामपंचायतीने स्वनिधीतून भरावयाची आहे.

अशी असणार दुमजली इमारत 
बांधण्यात येणारी नवीन ग्रामपंचायतीची इमारत दुमजली असून त्याचे क्षेत्रफळ ८३९.१७ चौरस फूट असेल. यामध्ये जनसुविधा केंद्राबरोबरच तलाठी, पोलिस पाटील, सरपंच, ग्रामसेवक, कृषी सहायक कार्यालयांबरोबरच शासकीय कर्मचाऱ्यांच्या बसण्याची व्यवस्था आणि बैठक हॉल असेल. महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र प्रसाधनगृहदेखील असणार आहे. ग्रामस्थांना शासकीय कागदपत्रांची देवाण-घेवाण करण्यासाठी स्वतंत्र खिडक्‍यादेखील यात असतील.

जिल्ह्यातील तालुकानिहाय ६४ ग्रामपंचायती
 बीड - बाळापूर, धनगरवाडी, गुंदावाडी, जेबापिंप्री, मानेवाडी, आंबेसावळी, बोरदेवी, काठोडा, कांबी, नागझरी.
 गेवराई - संगमजळगाव, सुर्डी (बु.), एरंडगाव, गोंदी (खु.), मानमोउी, रसुलाबाद, सिंदफणा चिंचोली, जयरामनाईक तांडा.
 अंबाजोगाई - राडी तांडा, चंदनवाडी, वाकडी, दगडवाडी, दत्तपूर, हनुमंतवाडी, चौथेवाडी, ममदापूर.
 आष्टी - धनगरवाडी (पिं.), पिंपळगावदाणी, कारंजी, हाजीपूर, कापसी, घोंगडेवाडी, नांदा, फत्तेवाडगाव.
 केज - डोगणवा, बानेगाव, धोत्रा, कोठी, नारेवाडी, मुंडेवाडी, पिराचीवाडी.
 माजलगाव : रोषणपुरी, रानपिंपळगाव.
 पाटोदा - अंतापूर, निवडुंगा, पांढरवाडी, बेदरवाडी, वैजाळा, मंझरीघाट, लंबारवाडी.
 परळी - औरंगपूर, भोजनकवाडी, चांदापूर, बोरखेड, गुट्टेवाडी, जळगव्हाण, मलनाथपूर, ममदापूर, तपोवन.
 धारूर - सुनरनवाडी, वाघोली, खामगांव.
 शिरूर कासार : हाजीपूर.
 वडवणी - केंडे पिंप्री.

Web Title: 64 Grampanchyat Building in Beed District